-->

काटा गाव क्षयरोगमुक्त; प्रशासनाच्या वतीने गौरव   प्रा. आ. केंद्राच्या परिश्रमाचे फलित

काटा गाव क्षयरोगमुक्त; प्रशासनाच्या वतीने गौरव प्रा. आ. केंद्राच्या परिश्रमाचे फलित

 


साप्ताहिक सागर आदित्य 

काटा गाव क्षयरोगमुक्त; प्रशासनाच्या वतीने गौरव 

प्रा. आ. केंद्राच्या परिश्रमाचे फलित 


राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत केंद्र सरकारने २०२५ पर्यंत देश क्षयरोगमुक्त करण्याचे धोरण निश्चित केले असून, नवीन क्षयरोग रुग्ण कमी करणे हा यामगाचा उद्देश आहे. क्षयरोगमुक्त गाव या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने क्षयरुग्णांवर आवश्यक उपचार व त्यांना सुविधा पुरवून काटा ग्रामपंचायत क्षयरोगमुक्त केली आहे. त्याबद्दल आरोग्य प्रशासनाच्या वतीने प्रा. आ. केंद्रातील अधिकारी, कर्मचारी व ग्रापं प्रशासनाचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला.

काटा ग्रामपंचायत व प्राथ. आरोग्य केंद्राचे अधिकारी, कर्मचारी यांनी  घरोघरी जावून क्षयरुग्ण शोध मोहीम राबवून तपासणी केली. या दरम्यान  कमी अधिक प्रमाणात क्षयरोगाचे प्रमाण आढळून आले त्यांचेवर तत्परतेने उपचार सुरू करुन त्यांना आवश्यक असलेली औषधी पुरवठा केला. यासाठी प्रा. आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सेवक, सेविका, आशा सेविका यांनी आपले कर्तव्य जबाबदारीने पार पाडले अन् त्याची फलश्रृती म्हणून आज काटा ग्रामपंचायत क्षयमुक्त झाली. याबद्दल जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने काटा ग्रापं व प्रा. आ. केंद्र अधिकारी, कर्मचारी यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

0 Response to "काटा गाव क्षयरोगमुक्त; प्रशासनाच्या वतीने गौरव प्रा. आ. केंद्राच्या परिश्रमाचे फलित "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article