-->

उपवासाला भगरीचे सेवन करतांना दक्षता घ्या  जिल्हा प्रशासनाचे आवाहन  > भगरीच्या अतिसेवनाने होऊ शकते विषबाधा

उपवासाला भगरीचे सेवन करतांना दक्षता घ्या जिल्हा प्रशासनाचे आवाहन > भगरीच्या अतिसेवनाने होऊ शकते विषबाधा



 साप्ताहिक सागर आदित्य 

उपवासाला भगरीचे सेवन करतांना दक्षता घ्या

जिल्हा प्रशासनाचे आवाहन

> भगरीच्या अतिसेवनाने होऊ शकते विषबाधा


वाशिम  : उपवासाला मोठ्या प्रमाणात भगरीचे सेवन केले जाते भगर खाल्ल्यामुळे अन्न विषबाधा झाल्याच्या अनेक घटना महाराष्ट्रात व वाशिम जिल्ह्यात घडत आहेत. त्यामुळे नागरिकांनी उपवासाला भगर खाताना दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे


'भगरीवर मोठ्या प्रमाणात अस्परजिलस प्रजातीच्या बुरशीचा प्रादुर्भाव होतो. ज्यामुळे फ्युमिगाफ्लेविन यासारखी विषद्रव्ये तयार होतात. ऑक्टोबर महिन्यातील तापमान आणि आर्द्रता बुरशीच्या वाढीसाठी अनुकूल असते. अशी बुरशीचा प्रादुर्भाव झालेली भगर खाण्यात आल्यास अन्न विषबाधा होऊ शकते. त्यामुळे भगर खाताना काळजी घ्यावी.


*काय काळजी घ्याल :*

बाजारातून भगर आणल्यानंतर ती निवडून स्वच्छ करा. शक्यतोवर पाकीटबंद भगर घ्या. ब्रॅंड नाव नसलेली किंवा लेबल नसलेली भगर पाकीटे व सूटी भगर घेऊ नका, भगर घेतांना

पाकीटावरचा पॅकींग दिनांक व अंतिम वापर दिनांक तपासावे. भगर साठवताना ती स्वच्छ कोरड्या ठिकाणी व्यवस्थित झाकणबंद डब्यात ठेवा. जेणेकरून वातावरणातील ओलाव्यामुळे बुरशीची वाढ होणार नाही. जास्त दिवस भगर साठवू नका. ती भगर खाऊ नका. शक्यतोवर भगरीचे पीठ विकत आणू नका, भगरीच्या पिठामध्ये वातावरणातील ओलावा शोषून

घेण्याची क्षमता अधिक असते. त्यामूळे पिठाला बुरशीची लागण होण्याची शक्यता जास्त असते. भगरीच्या दशम्या किंवा भाकरी खाण्याऐवजी खिचडी खावी. भगरीचे पीठ आवश्यक असेल तेवढेच दळून घ्या. जास्त दिवस पीठ साठवू नका. बाहेरुन दळून आणण्यापेक्षा घरीच दळा. भगर आणि शेंगदाणे हे अधिक प्रथिनयुक्त पदार्थ आहेत. दोन ते तिन दिवस सलग उपवास असताना या पदार्थांचे सेवन अॅसिडीटी वाढण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे उलटी, मळमळ व पोटाचे त्रास होतात. या पदार्थाचे सेवन पचनशक्तीनुसार मर्यादितच करावे. भगरीचे सेवन करतांना या गोष्टी लक्षात ठेवून संभाव्य अपाय टाळता येईल.


*…अन्यथा भगर विक्रेत्यांवर कारवाई*

भगर विक्रेत्यांनी पॅकबंद भगरचीच विक्री करावी. भगर खरेदी करतांना घाऊक विक्रेत्याकडून पावती घ्यावी. भगरीचे पॅकेट, पोल्यावर उत्पादकांचा पत्ता, परवाना क्र. पंग दिनांक, अल्म वापर दिनांक असल्याची खात्री करून घ्या. मुदतबाह्य भगर किंवा भगर पिठाची विक्री करू नये. सुटी भगर व खुले भगर पिट शक्यतो विक्रीसाठी ठेऊ नये. अन्न व औषध प्रशासनाचेवतीने भगर विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी करण्यात येत आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर अन्न सुरक्षा व मानके कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी कळविले आहे.

0 Response to "उपवासाला भगरीचे सेवन करतांना दक्षता घ्या जिल्हा प्रशासनाचे आवाहन > भगरीच्या अतिसेवनाने होऊ शकते विषबाधा"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article