
प्रा. आ.केंद्र काटा येथे आयुष्यमान आपल्या दारी
साप्ताहिक सागर आदित्य
प्रा. आ.केंद्र काटा येथे आयुष्यमान आपल्या दारी
आयुष्यमान भव मोहिम अंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या पत्र लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत कार्ड काढून देनेकरीता काटा येथे आरोग्य विभाग लाभार्थ्यांच्या घरोघरी जाऊन कार्ड काढून देत आहे.
आयुष्मान भारत योजने अंतर्गत पात्र लाभार्थींना पाच लाख रुपयांचा आरोग्य विमा केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत देय आहे.यामध्ये वाशिम व अकोला जिल्ह्यातील खाजगी हॉस्पिटल मध्ये रुग्णांना उपचार घेता येतो.
याकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुहास कोरे यांच्या मार्गद्शनात आरोग्य विभागाने पुढाकार घेतला असून काटा येथे आरोग्य विभाग लाभार्थ्यांच्या घरोघरी जाऊन कार्ड काढून देत आहे.वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय काळे,डॉ. फुफाटे,आरोग्य सेवक पुंडलीक देवढे, संगणक ऑपरेटर नेहा गोटे गट प्रवर्तक श्रीमती खंदारे,आशाताई यांचेसह रामराव सरनाईक समाजकार्य विद्यालयाचे विद्यार्थी यांनी गृह भेटी देऊन सदर कार्ड काढून दिले.तसेच गावामध्ये योजनेची माहिती देऊन जनजागृती केली.
आरोग्य अधिकारी सामान्यांच्या घरी पोहचत असल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
आयुष्यमान कार्ड काढणे करिता आता कोणत्याही कागद पत्रांची आवश्यकता नाही. पात्र लाभार्थींना केवळ आधार क्रमांकाद्वारे आपले कार्ड काढता येते.त्यामुळे सर्व पात्र लाभार्थींनी आपले आयुष्यमान गोल्डन कार्ड काढून घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुहास कोरे यांनी केले आहे.
0 Response to "प्रा. आ.केंद्र काटा येथे आयुष्यमान आपल्या दारी"
Post a Comment