-->

जिल्ह्यामध्ये आयुष्मान  भव या उपक्रमांतर्गत

जिल्ह्यामध्ये आयुष्मान भव या उपक्रमांतर्गत

 


साप्ताहिक सागर आदित्य 

जिल्ह्यामध्ये आयुष्मान  भव या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील आभा व गोल्डन कार्ड काढण्यापासून वंचित राहिलेले लाभार्थी यांचे गोल्डन व आभा कार्ड काढण्याची धडक मोहीम शनिवार दिनांक  7 ऑक्टोबर 2023 रोजी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रांअंतर्गत गावामध्ये उपकेंद्रामध्ये राबविण्यात आली सदर मोहिमेदरम्यान आभाकार्ड व गोल्डन कार्ड काढण्यापासून वंचित असलेले लाभार्थींना सदर ठिकाणी बोलून त्यांचे कार्ड काढण्यात आले सदर मोहिमेदरम्यान माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुहास कोरे सर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन  आभा कार्ड कसे काढावे याबाबत प्रत्यक्ष कृती करून दाखविली व  वाशिम जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील ज्या ठिकाणी सदर दिवशी गोल्डन व आभा कार्ड काढण्याबाबत कॅम्प राबविला त्या ठिकाणी जिल्हास्तरीय पर्यवेक्षक व जिल्हास्तरीय अधिकारी तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन सदर मोहीम यशस्वीपणे राबविली यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र पार्डीटकमोर 

अंतर्गत कळंबा महाली,खरोळा,भट उमरा, सावंगा व प्राथमिक आरोग्य केंद्र पार्डीटकमोर याप्रमाणे बऱ्याच गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन गोल्डन कार्ड व आभा कार्ड स्वतः काढून दाखविले  एकही लाभार्थी गोल्डन कार्ड व आभाकार्ड पासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेणेबाबत सर्व आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी तसेच समुदाय आरोग्य अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांना सूचना दिल्या तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र येथे औषधी भरपुर प्रमाणात उपलब्ध आहे

0 Response to "जिल्ह्यामध्ये आयुष्मान भव या उपक्रमांतर्गत "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article