
संविधान दिनानिमित्त जिल्हा परिषदेत राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेचे सामुहिक वाचन
साप्ताहिक सागर आदित्य
संविधान दिनानिमित्त
जिल्हा परिषदेत राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेचे सामुहिक वाचन
वाशिम: : जिल्हा परिषदेच्या वसंतराव नाईक सभागृहात आज संविधान दिनानिमित्त राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेचे (सरनामा) सामुहिक वाचन करण्यात आले. दि. 26 नोव्हेंबर हा दिवस शासन निर्देशानुसार सर्व शासकीय कार्यालयात संविधान दिन म्हणुन साजरा करण्यात येतो. त्यानुसार आज (दि. 26) जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा परिषदेचे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल निकम यांच्यासह विभाग प्रमुख अधिकारी व कर्मचार्यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतेमेला पुष्प हारार्पण केला.
यावेळी राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर राज्य घटनेच्या उद्देशपत्रिकेचे (प्रस्तावना) सामुहिक वाचन करण्यात आले.
समानता व बंधुतेच्या तत्वात बांधण्याचे काम संविधानाने केले: सुनिल निकम
जि. प. चे जिल्हा परिषदेचे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल निकम यांनी संविधान दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले. विविध प्रथा- परंपरा असलेल्या देशात सर्वांना समानता व बंधुता या तत्वात बांधण्याचे काम संविधानाने केले असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. संविधानामुळेच आपण मोकळा श्वास घेत असुन भारतातील सर्व स्री- पुरुषांनी याची जाणीव ठेवायला हवी असेही ते म्हणाले.
यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत सपकाळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डाॅ. विनोद वानखडे, महिला व बालकल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे, बांधकाम विभागाचे उपअभियंता वासुदेव पाटील, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. संगिता देशमुख यांच्यासह कर्मचार्यांची उपस्थिती होती.
0 Response to "संविधान दिनानिमित्त जिल्हा परिषदेत राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेचे सामुहिक वाचन"
Post a Comment