
महात्मा ज्योतिबा फुले वसतीगृह डोंगरकिन्ही येथे संविधान दिन साजरा
साप्ताहिक सागर आदित्य/
भारतीय संविधान दिनानिमित्त आज भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे विचार अंगिकारुन संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस हार अर्पण करण्यात आला, वस्तीगृह कर्मचारी संजय सुरडकर संस्था सचिव व वसतीगृह अध्यक्ष महेश अग्रवाल विविध प्रथा- परंपरा असलेल्या देशात सर्वांना समानता व बंधुता या तत्वात बांधण्याचे काम संविधानाने केले असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. संविधानामुळेच आपण मोकळा श्वास घेत असुन भारतातील सर्व स्री- पुरुषांनी याची जाणीव ठेवायला हवी असेही ते म्हणाले.
0 Response to "महात्मा ज्योतिबा फुले वसतीगृह डोंगरकिन्ही येथे संविधान दिन साजरा"
Post a Comment