
क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धा महोत्सवाचा समारोप. बक्षिस वितरण कार्यक्रमात जल्लोश
साप्ताहिक सागर आदित्य
क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धा महोत्सवाचा समारोप.
बक्षिस वितरण कार्यक्रमात जल्लोश
वाशिम: दि. 27
मागील तीन दिवसापासुन जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचार्यांच्या
क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धा महोत्सवाचा समारोप शनिवारी रात्री सायंकाळी 9.30 वाजता झाला.
वाशिम जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील निकम, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत सपकाळे, क्रिडा महोत्सवाचे अध्यक्ष तथा शिक्षण अधिकारी रमेश तांगडे, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी तुषार मोरे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. संगीता देशमुख, प्राथमिक शिक्षणाधिकारी शिंदे यांची यावेळी मंचावर उपस्थिती होती.
क्रीडास्पर्धे दरम्यान कर्मचार्यांनी ज्या खेळाडुवृत्तीने खेळांचे प्रदर्शन
केले, त्याच खेळाडुवृत्तीने आपले दैनंदिन कर्तव्य बजावल्यास सर्व सामान्यांना न्याय मिळून कामाची गती वाढेल असा विश्वास सीईओ वसुमना पंत यांनी व्यक्त केला. येथील जिल्हा क्रीडा मैदानावर सुरु असलेल्या जिल्हा परिषद क्रीडा स्पर्धेच्या
समारोपाप्रसंगी पंत यांनी खेळाडुच्या भूमिकेतील कर्मचार्यांशी (दि.26) संवाद साधला. गुरुवार दि. 24 ते शनिवार दि.
26 पर्यंत येथील जिल्हा क्रीडा संकुलावर जिल्हास्तरीय सांस्कृतिक व
क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या.
विजयाचा जल्लोष...
मालेगाव पंचायत समिती विरुध्द वाशिम पंचायत समिती या रोमहर्षक आणि उत्साहवर्धक पुरुष कबड्डी सामन्याचा मनमुराद आनंद उपस्थित सर्वांनी घेतला. या स्पर्धेत मालेगाव पंचायत समितीचा संघ विजयी ठरला तर वाशिम पंचायत समितीचा संघ उप विजयी ठरला. फुटबाॅलमध्ये मुख्यालयाचा संघ विजयी ठरला तर पंचायत समिती मानोरा संघ उपविजेता ठरला.
टेबल टेनिस या खेळामध्ये अंतिम सामन्यात मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत या विजयी ठरल्या. पंचायत समिती वाशिम येथील समुदाय आरोग्य अधिकारी वृषाली राणे यांना उपविजेत्या म्हणून घोषित करण्यात आलं.
विविध सामन्यात विजयी खेळाडुंना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जल्लोषात
बक्षीस वितरण करण्यात आले.
0 Response to "क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धा महोत्सवाचा समारोप. बक्षिस वितरण कार्यक्रमात जल्लोश "
Post a Comment