-->

कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण  अशासकीय सदस्य नियुक्तीसाठी संस्था व व्यक्तींकडून

कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण अशासकीय सदस्य नियुक्तीसाठी संस्था व व्यक्तींकडून

 


साप्ताहिक सागर आदित्य 

कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण

अशासकीय सदस्य नियुक्तीसाठी संस्था व व्यक्तींकडून


26 ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागविले


       वाशिम,  :  कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम २०१३ नुसार प्रत्येक शासकीय व निमशासकीय कार्यालये, महामंडळे, मंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, रुग्णालये व खाजगी आस्थापना याठिकाणी महिला तक्रार निवारण समित्या स्थापन करणे बंधनकारक आहे. या समित्यांमध्ये शासकीय सदस्या व्यतिरिक्त अशासकीय सदस्यांचा समावेश असावा. त्यानुसार समितीवर महिलांच्या विविध प्रश्नावर काम करत असणाऱ्या इच्छुक संस्था व व्यक्तींनी अर्ज सादर करण्यासाठी संस्था आणि व्यक्तीनी समितीवरील सदस्याबाबतचे अर्ज २६ ऑक्टोबरपर्यंत सादर करावे. संबंधितांनी अर्जाचा नमूना कार्यालयातून प्राप्त करुन घ्यावा. अधिक माहिती व अर्ज प्राप्त करुन घेण्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय येथे संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.



0 Response to "कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण अशासकीय सदस्य नियुक्तीसाठी संस्था व व्यक्तींकडून"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article