-->

शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांना  जर्मनीतून तुषार जोगीचे ऑनलाईन मार्गदर्शन

शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांना जर्मनीतून तुषार जोगीचे ऑनलाईन मार्गदर्शन

 


साप्ताहिक सागर आदित्य 

शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांना

जर्मनीतून तुषार जोगीचे ऑनलाईन मार्गदर्शन


वाशिम,  :  वाशिम येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे यंत्र अभियांत्रिकी पदविका विद्यार्थ्यांसाठी इंजिनिअरिंग मटेरियल अँड इट्स इम्पॉर्टन्स या विषयावर १५ ऑक्टोबर रोजी जर्मनी येथील रिसर्च साईंटीस्ट रुर युनिवर्सिटीचे तुषार जोगी यांचे ऑनलाईन एक्सपर्ट लेक्चरर आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला संस्थेचे प्राचार्य डॉ. बि. जि. गवलवाड, विभाग प्रमुख, शासकीय तंत्रनिकेतनचे अधिकारी वकर्मचारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.


 जोगी यांनी इंजिनिअरिंग मटेरियल त्यांचे प्रकार तसेच बदलत्या काळानुसार उद्योग क्षेत्रात झालेल्या क्रांतीनंतर याचे उपयोग याविषयी विस्तृत माहिती दिली. नवीन तंत्रज्ञानामुळे या मटेरीयालचा उपयोग सर्व क्षेत्रामध्ये होत असून त्याचे महत्वही त्यांनी संगितले.


यावेळी विभागप्रमुख के.पी जोशी म्हणाले, तज्ञांची व्याख्याने एखाद्या विशिष्ट विषयात खोलवर जाण्याची संधी देतात. तज्ञांना त्यांच्या क्षेत्राची सर्वसमावेशक समज असते म्हणून माहिती देऊ शकतात. जी कदाचित इतरत्र सहज उपलब्ध होणार नाहीत. या व्याख्यानाचा फायदा शैक्षणिक अभ्यासक्रमात व भविष्यामध्ये विद्यार्थ्यांना होईल अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.


मार्गदर्शन कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विचारलेल्या सर्व शंका व प्रश्नांचे निराकरण करण्यात आले. व्याख्यानाला यंत्र अभियांत्रिकी विभागाचे अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एन. एम. महात्मे व  के.के. चौधरी यांनी परिश्रम घेतले.


0 Response to "शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांना जर्मनीतून तुषार जोगीचे ऑनलाईन मार्गदर्शन"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article