
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला राम पाटील डोरले यांचे समर्थन
साप्ताहिक सागर आदित्य
मराठा आरक्षणासाठी अन्यत्याग सत्याग्रह
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला राम पाटील डोरले यांचे समर्थन
वाशिम - मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी दुसऱ्या टप्प्यातील उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला पाठींबा तसेच मराठा समाजाला तातडीने आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी आज (दि.३०) राम पाटील डोरले यांनी वाशिम येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्यत्याग सत्याग्रह केला. या उपोषण स्थळाला मोठ्या संख्येने समाजबांधव, सामाजिक कार्यकर्ते, नागरीकांनी प्रत्यक्ष भेटी देऊन समर्थन नोंदविले आहे.
राज्यातील मराठा समाज आरक्षणाअभावी प्रत्येक क्षेत्रात मागे राहत आहे. पात्रता असूनही संधीपासून वंचित राहत असल्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी मागणी जालना जिल्ह्यातील मनोज जरांगे पाटील यांनी केली. तसेच त्यांनी यासाठी सातत्याने याबाबतचा पाठपुरावा करून आंदोलन सुरू ठेवले. या आंदोलनाला पाठींबा देत, मराठा समाजबांधवांना आरक्षण द्यावे, या मागणीसाठी आज (दि.३०) राम पाटील डोरले यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्यत्याग सत्याग्रह करून आपले समर्थन दिले. या आंदोलनस्थळाला मोठ्या संख्येने नागरिकांनी भेटी देऊन आपला पाठिंबा दर्शविला. यामध्ये प्रामुख्याने गजानन भोयर, नाना देशमुख, किसनराव खोडे, मुन्ना भवानीवाले, घनश्याम मापारी, स्वप्नील वाघ, शुभम कंकाळ, मुकेश देशमुख, डॉ. प्रकाश कांबळे, विश्वजीत बनसोड, श्याम वानखेडे, राहुल सुरवाडे, ॲड. गजानन मोरे, प्रवीण पट्टेबहादूर यांच्यासह समाजिक कार्यकर्ते, नागरिकांचा सहभाग होता.
......
राज्यातील मराठा समाज आरक्षणापासून वंचित आहे. त्यामुळे समाजातील हुशार, होतकरू, सुशिक्षीत तरुणांची प्रत्येक टप्प्यावर पिछेहाट होत आहे. संपूर्ण समाजबांधवांची ही खंत डोळ्यासमोर ठेवून, मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी उपोषण सुरू केले. या उपोषणाला मी वाशिम जिल्ह्यातून पाठींबा देत असून, मराठा समाजाला तातडीने आरक्षण द्यावे, अशी मागणी करीत आहे.
-राम पाटील डोरले,
मराठा आरक्षण समर्थक, वाशिम
0 Response to "मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला राम पाटील डोरले यांचे समर्थन"
Post a Comment