
शंकरराव गवळी विद्यालयाचे ०६ खेळाडू विभागीय स्तरावर
साप्ताहिक सागर आदित्य
शंकरराव गवळी विद्यालयाचे ०६ खेळाडू विभागीय स्तरावर
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा दि.०७ ऑक्टोबर व ०८ ऑक्टोबर २०२३ रोजी जिल्हा क्रीडा संकुल वाशिम येथे संपन्न झाल्या. यामध्ये अमानी येथील स्व. शंकरराव गणुजी गवळी विद्यालयाच्या १९ खेळाडूंनी विविध क्रीडा स्पर्धेत भाग घेतला.यामध्ये १४ वर्षे वयोगटात कु. भक्ती गवळी उंच उडी द्वितीय, १९ वर्षे वयोगटातील कु.अर्चना खिल्लारी उंच उडी मध्ये-प्रथम व १०० मी.हर्डल्स मध्ये -द्वितीय तसेच ४×४०० मी. रिले-प्रथम क्रमांक पटकावून निर्विविवाद वर्चस्व स्थापन केले यामध्ये वैष्णवी धोंगडे,अर्चना खिल्लारी,ऋतिका गवळी,वैष्णवी करवते व आरती खडसे यांचा समावेश होता.
या सर्व विजयी खेळाडूंचा विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल गवळी यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व विभागीय स्तरासाठी शुभेच्छा दिल्या.या सर्व विद्यार्थ्यांना विद्यालयातील क्रीडा शिक्षक एन.डी. भिंगे यांनी मार्गदर्शन केले. विद्यालयातील पार पडलेल्या छोटेखानी कार्यक्रमांमध्ये विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक व्हि.के.खिल्लारे, आर.बी.नव्हाळे, पी.एस.सरनाईक, ओ.एल.सरकटे, एस.एस.ठाकरे, व्ही. बी. गवळी,डी.जी.तागड हे उपस्थित होते.वरील सर्व विजयी खेळाडू विभागीय शालेय मैदानी स्पर्धेत वाशिम जिल्हयाचे नेतृत्व करणार आहेत. विजयी खेळाडूंवर गावातील सर्व नागरिकांकडून कौतुकांचा वर्षाव होत आहे.
0 Response to "शंकरराव गवळी विद्यालयाचे ०६ खेळाडू विभागीय स्तरावर"
Post a Comment