-->

19 ऑक्टोबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्हयात स्थापीत 8 प्रशिक्षण केंद्राचे ऑनलाईन उदघाटन

19 ऑक्टोबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्हयात स्थापीत 8 प्रशिक्षण केंद्राचे ऑनलाईन उदघाटन



 साप्ताहिक सागर आदित्य 

19 ऑक्टोबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्हयात स्थापीत 8 प्रशिक्षण केंद्राचे ऑनलाईन उदघाटन


उदघाटन सोहळयाचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्याचे आवाहन

      

 वाशिम, ग्रामीण भागातील 18 ते 45 वयोगटातील युवकांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याकरीता ग्रामपंचायतस्तरावर कौशल्य, विकास,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागाकडून राज्यात 511 ठिकाणी प्रमोद महाजन उद्योजकता कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.या प्रशिक्षण केंद्रात जिल्हयातील इच्छुक युवकांना पुर्णत: नि:शुल्क स्वरुपाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

          या स्थापीत झालेल्या प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 19 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे.हा उदघाटन कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीसुध्दा व्हीडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सूचना दिल्या आहे.

                  जिल्हयातील वाशिम तालुक्यातील अनसिंग,मालेगांव तालुक्यातील किन्हीराजा व शिरपुर, मंगरुळपीर तालुक्यातील जांब - सोनखास,कारंजा तालुक्यातील कामरगांव व उंबर्डाबाजार,रिसोड तालुक्यातील वाकद व मानोरा तालुक्यातील पोहरादेवी या 8 ग्रामपंचायतस्तरावर स्थापीत प्रशिक्षण केंद्राचे ऑनलाईन उदघाटन होणार आहे.

                 तरी या ग्रामपंचात व जवळच्या ठिकाणचे रोजगार इच्छुक युवक,पालक व इतर रहिवाशानी 19 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता उपस्थित राहून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असलेल्या प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य केंद्राच्या उदघाटन व मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांनी केले आहे           

                     

0 Response to "19 ऑक्टोबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्हयात स्थापीत 8 प्रशिक्षण केंद्राचे ऑनलाईन उदघाटन"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article