-->

वाशीम जिल्ह्यात शिवसेनेचे जनसंपर्क अभियान सुरू

वाशीम जिल्ह्यात शिवसेनेचे जनसंपर्क अभियान सुरू

 


साप्ताहिक सागर आदित्य/

वाशीम जिल्ह्यात शिवसेनेचे जनसंपर्क अभियान सुरू


शिवसेना पक्ष प्रमुख  उध्दव ठाकरे याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वाशीम जिल्हय़ाचे जिल्हा प्रमुख सुधिर कव्हर याच्या उपस्थित शिवसेनेचे मालेगाव तालुक्यात जनसंपर्क अभियान सुरू आहे


  अभियानाची सुरुवात मालेगाव तालुक्यातील मेडशी सर्कलमधील उमरवाडी. मेडशी वाकळवाडी. मुंगळा या चार गावात वाशीम जिल्ह्य़ाचे शिवसेना जिल्हा प्रमुख सुधिर कव्हर यांच्या नेतृत्वात तालुकाप्रमुख उध्दव पाटील गोडे ,उपतालुकाप्रमुख भगवान बोरकर,उपतालुकाप्रमुख विनोद राऊत,सर्कलप्रमुख विठ्ठल भागवत,गजानन बोरचाटे,भारत घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा शिवसेना संपर्क अभियान घेण्यात आले या अभियाना मध्ये सर्व नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या समस्याची नोद करून काही समस्या जाग्यावर सोडवण्यात आल्या शेतकरी, शेतमजूर. व सुशिक्षित बेरोजगार याच्या समस्या सोडवण्यासाठी शिवसेना पक्ष म्हणून सर्व तो परी कटिबद्ध असल्याचे अभिवाचन जिल्हाप्रमुख डॉ, सुधीर कव्हर यांनी वरील सर्व गावातील उपस्थित नागरिकांना दिले या अभियानात मेडशी सर्कल मधील सर्व पदाधिकारी, शाखाप्रमुख व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन उप तालुका प्रमुख विनोद राऊत तर आभारप्रदर्शन विठ्ठल भागवत यांनी केले.

Related Posts

0 Response to "वाशीम जिल्ह्यात शिवसेनेचे जनसंपर्क अभियान सुरू"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article