
कृषि महाविद्यालय आणि कृषि तंत्र विद्यालय,आमखेडा येथे स्वातंत्र्य दिन साजरा
साप्ताहिक सागर आदित्य
कृषि महाविद्यालय आणि कृषि तंत्र विद्यालय,आमखेडा येथे स्वातंत्र्य दिन साजरा
आमखेडा: डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला, संलग्नित गीताई ह्युमन काईंड डेव्हलपमेंट ट्रस्ट पुणे, द्वारा संचालित कर्मयोगी बाबारावजी जोगदंड कृषि महाविद्यालय आणि कृषि तंत्र विद्यालय, आमखेडा (अहिंसातीर्थ) ता. मालेगाव . जिल्हा: वाशिम येथे दिनांक १५ ऑगस्ट २०२३ रोजी स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आले. भारत माता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर , डॉ. पंजाबराव देशमुख आणि महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. बबनराव अवघडे (माजी कार्यक्रम अधिकारी महाबिज) यांनी ध्वज पूजन करून ध्वजारोहण केले. त्यानंतर मेरी माती मेरा देश अंतर्गत पंचप्रण शपथ घेण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अविनाश माणिकराव जोगदंड ( मुख्य कार्यकारी अधिकारी) व प्रमुख पाहुणे बबनराव अवघडे, परशराम जोगदंड, हिम्मतराव जोगदंड, पुंडलीक जोगदंड , राजेश घुगे, सुरेश जोगदंड, गजानन पाचरणे, भागवत जोगदंड , शुभम जोगदंड, विजयभाऊ शेळखे आणि गावातील प्रतिष्टीत नागरिक उपस्तित होते. यानंतर अध्यक्षांचे व प्रमुख पाहुण्यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यामध्ये प्रथम वर्षातील विद्यार्थी प्रथम कमांक अभिषेक सोरमारे, व्दितीय क्रमांक सुदीप जाधव व तृतीय क्रमांक मेगा पंधारे तसेच द्वितीय वर्षातील विद्यार्थी प्रथम क्रमांक पवन खंडारे ,द्वितीय क्रमांक अभिजीत तायडे व तृतीय क्रमांक अविनाश कांबळे व तसेच चतुर्थ वर्षातील विद्यार्थी प्रथम क्रमांक साहेबा शेख, व्दितीय क्रमांक अंजली गव्हाणे आणि तृतीय क्रमांक चेतन खाडे यांना प्रगतीपत्रक आणि पारितोषके मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली आणि योगा परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार व तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमाणपत्र देण्यात आले . कार्यक्रमाचे अध्यक्ष . अविनाश माणिकराव जोगदंड ( मुख्य कार्यकारी अधिकारी) आणि कार्यक्रमाला उपस्थित राजेश घुगे, बबनराव अवघडेआणि यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी द्वितीय वर्षातील विद्यार्थीनी _ पुनम वाघमारे आणि विद्यार्थी_रोशन बेलखेडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. चतुर्थ वर्षातील विद्यार्थी चेतन खाडे आणि विद्यार्थीनी _ अंजली गव्हाणे आणि यांनी कार्यक्रमाचे सुत्र संचालन केले , कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. एन. एम. काळे ( जन संपर्क अधिकारी )यांनी केले आणि चतुर्थ वर्षातील विद्यार्थी_रोशन बेलखेडे कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी कृषि महाविद्यालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश जोगदंड, प्राचार्य डॉ. एस. ए. काळे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाला कृषि महाविद्यालय, आमखेडाचे प्राचार्य. डॉ.एस.ए. काळे, एन. एम. काळे ( जनसंपर्क अधिकारी), डॉ. आर. एस. करंगामी (रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी), प्रा. एस. वाकुडकर, प्रा. एस. टी. जाधव, प्रा. अरुण वाघ, प्रा. मोहन सुरुशे , प्रा. स्नेहा अटालकर आणि प्रा. वैष्णवी बीजने व कृषि तंत्र विद्यालयाचे प्राचार्य अंकुश वाठोरे , प्रा. आशिष पुरी, प्रा. यु. आर. पुरंदरे, अनिल तायडे, रवी लठाड, हातोलकर ( कृषि सहाय्यक आणि सर्व प्राध्यापक वृंद, कर्मचारी व विद्यार्थी _ विद्यार्थीनी उपस्थित होते.
0 Response to "कृषि महाविद्यालय आणि कृषि तंत्र विद्यालय,आमखेडा येथे स्वातंत्र्य दिन साजरा "
Post a Comment