-->

मुसळवाडी येथील कदम कुटुंबास ॲड.देशमुख यांची सांत्वन भेट.  - आर्थिक मदतीसाठी तहसीलदांरांशी चर्चा  - पाल्याची शिक्षणासाठी लावणार हातभार

मुसळवाडी येथील कदम कुटुंबास ॲड.देशमुख यांची सांत्वन भेट. - आर्थिक मदतीसाठी तहसीलदांरांशी चर्चा - पाल्याची शिक्षणासाठी लावणार हातभार

 


साप्ताहिक सागर आदित्य 

मुसळवाडी येथील कदम कुटुंबास ॲड.देशमुख यांची सांत्वन भेट.

- आर्थिक मदतीसाठी तहसीलदांरांशी चर्चा

- पाल्याची शिक्षणासाठी लावणार हातभार

मालेगाव - मालेगाव तालुक्यातील मुसळवाडी येथे वीज पडून  निवास गोविंदा कदम यांचा दुर्दैवी मृत्यु झाला.भाजप नेते ॲड नकुल देशमुख यांनी कदम कुटुंबाची भेट घेऊन संत्वान केले.

मान्सून पूर्व वादळी व विजेच्या कडकडाट सह झालेल्या अवकाळी पावसात वीज पडून मालेगाव तालुक्यातील मुसळवाडी येथील निवास कदम यांचा मृत्यु झाला व यात त्यांचे वडील गोविंदा कदम जखमी झाले.सदर कदम परिवाराची भाजप नेते ॲड नकुल देशमुख यांनी भेट घेत सांत्वन केले.स्व.निवास कदम यांच्या पश्चात एक मुलगा,पत्नी,दोन भाऊ,आई वडील आणि मोठा परीवार आहे.या घटने बद्दल मुसळवाडी,अमानवाडी सहित परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.या सांत्वन भेटी प्रसंगी भाजप नेते ॲड नकुल देशमुख यांनी मालेगांव तालुक्याचे तहसीलदार पुंड यांच्याशी दूरध्वनी वरून संपर्क करून स्व.निवास कदम यांच्या कुटंबीयांनी आर्थिक मोबदला मिळण्या संदर्भात चर्चा केली.दरम्यान लवकरच कदम परिवारास आर्थिक मोबदला मिळनार असल्याचे ॲड.देशमुख यांनी कदम कुटुंबीया व गावकऱ्यास तहसीलदार पुंड यांच्याशी चर्चा केल्या नंतर संगितले.यावेळी देशमुख यांनी स्व.निवास कदम यांच्या पाल्याचा शिक्षणासाठी हातभार लावणार असून.येणाऱ्या काळात त्यांच्या बांधून नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. ॲड.देशमुख यांच्या या पुढाकारामुळे कदम कुटुंबास मोठा आधार मिळणार असून देशमुख यांच्या या गोष्टीचे सर्व सामान्य,गोरगरीब गावकरी मंडळी व परिसरातील नागरिकानी कौतुक केले.या सांत्वन भेटी प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ.जगदीशराव घुगे,माजी सरपंच नंदकिशोर जयस्वाल,सरपंच अमानवडी अशोकराव कांबळे,रमेश लाहुडकर,नामदेवराव मामा,ज्ञानेश्वर कोरडे,काशिनाथ मोरे सहित गावकरी तसेच परिसरातील मंडळी उपस्थित होती.

Related Posts

0 Response to "मुसळवाडी येथील कदम कुटुंबास ॲड.देशमुख यांची सांत्वन भेट. - आर्थिक मदतीसाठी तहसीलदांरांशी चर्चा - पाल्याची शिक्षणासाठी लावणार हातभार"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article