
सात जन्मा पेक्षा याच जन्मात स्त्री - पुरुषांचे नाते म्हणजे (नवरा बायकोचे)नाते हे अतुट व विश्वासु असावे,
साप्ताहिक सागर आदित्य
आज वटपोर्णीमा आहे,वडाला सात फेऱ्या मारुन पुढच्या सात जन्मी हाच पती मिळावा ही प्रत्येक स्त्रीची प्रांजळ इच्छा असते, वटपोर्णीमा हा एक हिंदू धर्मातला सन मानला जातो,
पण हल्ली बऱ्याच शिकलेल्या मुली वडाला जात नाही, व पुजा करत नाही, काही जुन्या जाणत्या महिला दरवर्षी वडाला जातात, या निमत्ताने नवऱ्याला बरे वाटावे किंवा समाज काय म्हणेल किंवा नटण्यासवरण्याची पण हौस पुर्ण होते, या हेतुने जात असतील,
नवरा दारुडा असो, मारहाण करणारा असो, किंवा पुर्ण व्यसनाधिन असो, बाईलवेडा असो, तरी ही तिला हाच नवरा पुढिल सात जन्मी मिळावा अशी इच्छा का असते,?? तिला ही तिचा चॉईस निवडण्याचा अधिकार का असु नये, ??
एकवेळ दारु पिणारा नवरा बरा पण स्त्रीच्या चारीत्र्यावर सतत संशय घेणारा व तिला मारहाण करणारा नवरा नको याच कारणाने कोर्टात घटस्पोटासाठी अनेक फाईली वर्षानुवर्ष धुळ खात पडून आहेत, अनेक पती पत्नी विभक्त राहतात यात मुलांची हेळसांड होत असते,नातेवाईकांत व समाजात किमंत राहत नाही,
अगदी वयाची पन्नाशी पार करुन देखील नवरा बायकोत आजही संशयीतवृतीने भांडणे होतात, मुले आहेत म्हणुन एकत्र राहतात किंवा समाजाच्या आई वडिलांच्या भितीपोटी एकत्र राहतात पण संवाद व एेकोपो दिसुन येत नाही,
मग कुठली स्त्री पुढच्या सात जन्मी हाच पती मिळावा अशी इच्छा का व्यक्त करेल?
मंडळी पुढच्या सात जन्माचा विषय सोडून द्या, मागच्या जन्मी आपण कोण होतो याची तरी जाणिव आहे का आपल्याला, ??
एकदा नवऱ्याला विचारा पुढच्या सात जन्मी मी पत्नी म्हणुन चालेल का तुम्हाला?
त्याची पण परवानगी घेणे आज गरजेचे वाटत नाही का?
तुकोबांच्या ओवी आहेत,
साखर नोव्हे ऊस ।
आम्हा काय गर्भवास ।।
बिज पेरुनी लाही ।
जन्म मरण आम्हा नाही ।।
याचाच अर्थ असा होतो की,
साखरे पासुन पुन्हा ऊसाची निर्मिती होत नाही,
लाह्या भाजून त्या जर पेरल्या तर लाह्यांपासुन पुन्हा बिज अंकुरत नाही, पुन्हा पिक येत नाही,
तसेच माणुस मेला की त्याची राख होते व राखेपासुन पुन्हा माणसाला मनुष्य जन्म नाही, ही जिवना बद्दलची साधी आणी सरळ व्याख्या आहे,
सात जन्मा पेक्षा याच जन्मात स्त्री - पुरुषांचे नाते म्हणजे (नवरा बायकोचे)नाते हे अतुट व विश्वासु असावे,
जसे बायकांचे सन असतात तसे पुरुषांचे पण असायला हवे होते, संगळी बंधने बायकांनाच का?
पुरुषांची काहीच जबाबदारी नाही का?
पुरुषांनी समाजात वावरताना आपली प्रतिमा मलिन होणार नाही याची काळजी घेतली पाहीजे, घरात वावरताना बायकोला देखील मान सन्मान दिला पाहीजे, स्वताः निरव्यसनी असायला हवे, स्वताःचे चारीत्र देखील स्वच्छ व निर्मळ असायला हवे, बायकोवर संशय घेण्यापेक्षा आपण बाहेर काय करतो याचा देखील विचार करायला हवा की नाही?
नवरा मुले हिच प्रत्येक स्त्रिची खरी संपत्ती आहे, तिला बाकिची कशाचीच अपेक्षा नसते,
प्रत्येक स्त्रिला जर नवरा सर्वच गोष्टीत परीपुर्ण मिळाला सदगुणी मिळाला तर सात जन्मी काय पुढच्या कित्येक जन्मी हाच नवरा मला मिळो हिच तिची प्रामाणिक इच्छा कायम राहिल,
या आजच्या वटपोर्णीमेच्या निमित्ताने पुरुषांनी देखील हाच विचार केला पाहीजे पुढचे अनेक जन्म मला हिच पत्नी मिळो,
बायकोला चांगला पती मिळावा,
मुलांना चांगला बाप मिळावा,
आईवडिलांना चांगला मुलगा मिळावा,
समाजात व जनमाणसांत प्रत्येक पुरुषाची प्रतिमा सुंदर व प्रभावशाली असावी,
असे असेल तर प्रत्येक स्त्रीला आपला पती कायम स्वरुपी हवा हवासा वाटेल,
वटपोर्णीमेच्या सर्व महिला भगिणींना हार्दिक शुभेच्छा
पार्वती प्रकाश लहाने
0 Response to "सात जन्मा पेक्षा याच जन्मात स्त्री - पुरुषांचे नाते म्हणजे (नवरा बायकोचे)नाते हे अतुट व विश्वासु असावे, "
Post a Comment