-->

महाडिबीटीबाबत समाज माध्यमांवरील संदेश चूकीचा  कृषी विभागाची माहिती  लाभाच्या घटकांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

महाडिबीटीबाबत समाज माध्यमांवरील संदेश चूकीचा कृषी विभागाची माहिती लाभाच्या घटकांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 


साप्ताहिक सागर आदित्य 

महाडिबीटीबाबत समाज माध्यमांवरील संदेश चूकीचा

कृषी विभागाची माहिती

लाभाच्या घटकांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

        वाशिम,  : सद्यस्थितीत समाज माध्यमातून राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडिबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरण्याची व सोडत 15 मे 2023 पर्यंत असल्याचे तसेच 15 मे नंतर जवळपास दोन ते तीन महिने ऑनलाईन शेतकरी निवड सोडत होणार नाही. अशा आशयाचे संदेश अज्ञात व्यक्तीकडून विविध समाज माध्यमांवर प्रसारीत केलेले आहे.


           महाडिबीटी पोर्टल संदर्भात अशा प्रकारचा कोणताही संदेश/माहिती कृषी विभागामार्फत देण्यात आलेली नाही. याबाबत शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी. महाडिबीटी पोर्टल या संगणकीय ऑनलाईन प्रणालीवर अर्ज करण्याची सुविधा 24 तास उपलब्ध आहे. अर्ज केलेल्या घटकांची सोडत शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जानुसार व आवश्यकतेनुसार दर आठवडयाला काढण्यात येते. तरी https://mahadbt.maharashtra.gov.in /शेतकरी योजना या सदराखाली जाऊन विविध लाभाच्या घटकांसाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावे. असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.   



Related Posts

0 Response to "महाडिबीटीबाबत समाज माध्यमांवरील संदेश चूकीचा कृषी विभागाची माहिती लाभाच्या घटकांसाठी अर्ज करण्याचे आवाहन"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article