-->

दिनदयाळ अंत्योदय योजना व राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान

दिनदयाळ अंत्योदय योजना व राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान

 

साप्ताहिक सागर आदित्य 

दिनदयाळ अंत्योदय योजना व राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान

अकाऊंड एक्झीक्युटिव्ह अभ्यासक्रमाचे मोफत प्रशिक्षण

        वाशिम,  : दिनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान,नगर परिषद वाशीमअंतर्गत कौशल्य विकास प्रशिक्षणाचा कार्यक्रम शासन मान्यता प्राप्त प्रशिक्षण केंद्रामार्फत मोफत सुरु आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळामार्फत प्रशिक्षण पूर्णत्वाचे प्रमाणपत्र, प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर रोजगार/स्वयंरोजगाराची संधी, संबंधित कौशल्य अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर स्वयंरोजगार वैयक्तिक व्यवसायासाठी बँकेमार्फत कर्ज शहरातील लाभार्थ्यांना मिळते.

            या योजनेचा लाभ सामाजिक, आर्थिक,जातीनिहाय सर्वेक्षण (एसईसीसी-२०११) यादीतील लाभार्थी किंवा सुवर्ण जयंती शहरी योजनेच्या यादीतील लाभार्थी, अनुसूचित जाती/जमाती,स्त्रिया, अल्पसंख्याक व दिव्यांग यांना मिळणार आहे.यासाठी वयोमर्यादा १८ ते ४५ या वयोगटातील असावे. लाभार्थी हा वाशीम नगरपालिका हद्दीतील रहिवाशी असणे आवश्यक आहे.

            अकाऊंड एक्झीक्युटीव्ह अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण पुर्णपणे मोफत असून दोन महिन्याच्या कालावधीचे आहे.यासाठी शैक्षणिक पात्रता इयत्ता 12 वी पास असणे आवश्यक आहे.अर्जासोबत आधारकार्ड,मतदान कार्ड,रेशनकार्ड, बँक पासबुक, जातीचा दाखला, दिव्यांग प्रमाणपत्र, (एसईसीसी- २०११) यादीतील क्रमांक / सुवर्ण जयंती शहरी योजनेच्या यादीतील लाभार्थी (बीपीएस) प्रमाणपत्र आदी कागदपत्रे जोडणे आवश्यक असून सदर कागदपत्रे सोबत घेऊन व्यंकटेश सेवा समिती,कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालय वरचा माळा, हिंगोली नाका,वाशिम येथे संपर्क साधावा. असे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी . वाहुरवाघ यांनी कळविले आहे.



Related Posts

0 Response to "दिनदयाळ अंत्योदय योजना व राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article