-->

महामंडळाच्या नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत प्रशिक्षणाकरीता अर्ज सादर करण्याचे आवाहन

महामंडळाच्या नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत प्रशिक्षणाकरीता अर्ज सादर करण्याचे आवाहन

 


साप्ताहिक सागर आदित्य 

महामंडळाच्या नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत प्रशिक्षणाकरीता अर्ज सादर करण्याचे आवाहन


वाशिम, : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील कुटुंबाची सामाजिक, आर्थिक उन्नतीसाठी रोजगार व स्वयंरोजगाराची साधने उपलब्ध व्हावेत याकरिता सन २४-२५ या आर्थिक वर्षात या योजनेअंतर्गत २०० प्रशिक्षण योजनेचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे.


इच्छुक पात्र लाभार्थ्यांनी महामंडळाच्या विहीत नमुन्यातील अर्ज जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन चिखली रोड, वाशिम जिल्हा कार्यालयास सादर करावा.


या योजनेस लागणारे कागदपत्रांमध्ये अर्जदाराचा जातीचा दाखला सक्षम अधिकारी यांच्याकडून घेतलेला असावा. अर्जदाराचा ३ लक्ष रुपयांपर्यंत तहसीलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला असावा. नुकताच काढलेल्या पासपोर्ट साईज फोटोच्या प्रत, रेशनकार्डच्या झेरॉक्स प्रत, आधार कार्ड झेरॉक्स प्रत, आधार लिंक मोबाईल क्रमांक, मतदान कार्ड, अर्जदाराचा शैक्षणिक दाखला, प्रशिक्षणार्थी मातंग समाजातील व तत्सम १२ पोटजातीतील असावा. महाराष्ट्राचा रहिवासी असावा.वय १८ ते ५० वर्ष असावे. यापूर्वी शासनाच्या/ महामंडळाच्या कोणत्याही प्रशिक्षण योजनेचा लाभ घेतलेला नसावा. एका कुटुंबातील एका व्यक्तीला एकाच व्यक्तीला सदर योजनेचा लाभ घेता येईल. प्रशिक्षणार्थीने आधार कार्ड जोडलेल्या बॅंक खात्याचा तपशील सादर करावा.


या योजनेचा लाभ जिल्ह्यातील अर्जदारांनी घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक जे एम गाभणे यांनी केले आहे.


0 Response to "महामंडळाच्या नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत प्रशिक्षणाकरीता अर्ज सादर करण्याचे आवाहन"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article