
वैयक्तिक लाभाच्या योजना लाभार्थ्यांकडून 11 जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज आमंत्रित
साप्ताहिक सागर आदित्य
वैयक्तिक लाभाच्या योजना
लाभार्थ्यांकडून 11 जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज आमंत्रित
वाशिम, : पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद,वाशिम यांच्यावतीने सन 2022-23 या वर्षासाठी वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी लाभार्थ्यांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्यासाठी https://ah.mahabms.com हे संकेतस्थळ व गुगल प्ले स्टोरवरील AH.MAHABMS हे मोबाईल ॲप उपलब्ध करुन देण्यात आले आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीनेच स्विकारण्यात येणार आहे. लाभार्थ्यांची निवडसुध्दा ऑनलाईन पध्दतीनेच होणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2023 आहे.
विशेष घटक योजनेअंतर्गत अनुसूचित जाती/ नवबौध्द लाभार्थ्यांना व आदिवासी उपयोजनेअंतर्गत आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी लाभार्थ्यांना 75 टक्के अनुदानावर 2 दुधाळ जनावरांचा पुरवठा करण्यात येणार आहे. यामध्ये लाभार्थ्यांची निवड झाल्यास लाभार्थ्याला एक महिन्याच्या आत 21 हजार 265 रुपये लाभार्थी हिस्सा चलनाव्दारे भरावा लागेल. या योजनेत अनुदान प्राप्त झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना 2 दुधाळ जनावरे राज्याबाहेरील किंवा जिल्हयाबाहेरील गुरांचे बाजारातून खरेदी करुन देण्यात येईल.
विशेष घटक योजनेअंतर्गत अनुसूचित जाती/ नवबौध्द लाभार्थ्यांना व आदिवासी उपयोजनेअंतर्गत आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी लाभार्थ्यांना 75 टक्के अनुदानावर 10 अधिक 1 शेळी गटाचा पुरवठा करण्यात येणार आहे.यामध्ये लाभार्थ्यांची निवड झाल्यास लाभार्थ्याला एक महिन्याच्या आत उस्मानाबादी/ संगमनेरी जातीसाठी 25 हजार 886 रुपये व स्थानिक जातीसाठी 19 हजार 558 रुपये लाभार्थी हिस्सा चलनाव्दारे भरावा लागेल. शेळी गटाची खरेदी ही प्राधान्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी महाराष्ट्र मंडळाकडून करण्यात येईल.
तरी या योजनेचा जिल्हयातील गरजू लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन सभापती वैभव सरनाईक व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.व्हि.एन. वानखडे यांनी केले आहे.
0 Response to "वैयक्तिक लाभाच्या योजना लाभार्थ्यांकडून 11 जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज आमंत्रित"
Post a Comment