-->

श्री पांडुरंग विद्यालयाचे दोन आट्यापाट्या संघ विभागीय स्तरावर

श्री पांडुरंग विद्यालयाचे दोन आट्यापाट्या संघ विभागीय स्तरावर

  


साप्ताहिक सागर आदित्य 

श्री पांडुरंग विद्यालयाचे दोन आट्यापाट्या संघ विभागीय स्तरावर

  मालेगाव:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे तथा  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वाशिम व एकविध खेल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २० डिसेंबर २०२२ रोजी यशवंतराव चव्हाण क्रीडा संकुल, मंगरूळपीर येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय आट्यापाट्या क्रीडा स्पर्धा पार पडल्या. यामध्ये श्री.पांडुरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पिंपळाच्या १४ वर्षे वयोगटातील मुले व मुलीचा संघ जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त करून विभागीय स्तरावर पात्र ठरला. 

     १४ वर्षे वयोगटातील मुलांच्या संघाने हॅप्पी फेसेस मालेगाव व यशवंतराव चव्हाण विद्यालय, मंगरूळपीर या संघाचा पराभव करून विजेतेपद मिळविले.  या संघामध्ये प्रमोद धोंगडे, यश चौधरी, गणेश खुळे, रोशन तिवाले, हर्षद देवळे, रोशन गुडदे,लखन भालेराव, करण धोंगडे, शिवप्रेम चव्हाण,सोहन ढंगारे, शंकर डाखोरे,चेतन देवळे इ.खेळाडूंनी भाग घेतला. 

    १४वर्षे वयोगटातील मुलींच्या संघांमध्ये कु. तेजस्विनी गुडदे, कु.शिवानी धोंगडे, कु.हर्षदा चौधरी,कु शिवकन्या धोंगडे,कु.गीता गोटे,कु.काजल कांबळे, कु.ममता गुडदे,कु.श्रद्धा डोंगरे, कु.चित्रा झ्याटे,कु.सलोनी पाखरे,कु.निशा जामकर ,कु.आदिती घुगे इ.मुलींनी भाग घेतला. 

    विद्यालयाचे  वरील दोन्ही संघ वाशिम जिल्ह्याचे नेतृत्व अमरावती येथील विमलताई देशमुख महाविद्यालयात दि.२८ व २९ डिसेंबर २०२२ रोजी होणाऱ्या अमरावती विभागीय शालेय आट्यापाट्या क्रीडा स्पर्धामध्ये करणार आहेत. दोन्ही संघाना जिल्हा क्रीडा मार्गदर्शक किशोर बोंडे सर, इंगोले सर, विटकरे सर,शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारप्राप्त सागरभाऊ गुल्हाणे, अजित बुरे साहेब यांनी विभागीय स्पर्धेकरीता शुभेच्छा दिल्या. 

    वरील दोन्ही संघ आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनिल भाऊ गवळी सर प्राचार्य आर.एन.देशमुख सर तसेच क्रीडा शिक्षक  एन.डी.भिंगे व क्रीडा मार्गदर्शक जी.डी.कोरडे तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व कर्मचारीवृंद यांना देतात.

Related Posts

0 Response to "श्री पांडुरंग विद्यालयाचे दोन आट्यापाट्या संघ विभागीय स्तरावर"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article