-->

व्हॉईस ऑफ मीडिया’ची जिल्हा कार्यकारणी जाहिर

व्हॉईस ऑफ मीडिया’ची जिल्हा कार्यकारणी जाहिर

 


साप्ताहिक सागर आदित्य 

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची जिल्हा कार्यकारणी जाहिर

वाशीम :  तमाम पत्रकाराचा बुलंद आवाज म्हणून ओळख असलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ या संघटनेची बैठक २३ डिसेंबर रोजी पार पडली. स्थानिक शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत जिल्हा कार्यकारिणीचे गठण करण्यात आले़ 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे जिल्हाध्यक्ष भागवत मापारी हे उपस्थित होते. या प्रसंगी पत्रकारांची आरोग्य मोहिम या योजनेंतर्गत पत्रकार व त्यांचे कुटुंबियांचा ‘सुरक्षा कवच विमा’या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रात्यनिधीक स्वरुपात उपस्थित पत्रकारांचा विमा डाग विभागाचे गणेश तिखे यांनी उतरविला़ दरम्यान,  जिल्हाध्यक्ष मापारी यांनी जिल्हा कार्यकारिणीचे गठण करुन जाहिर केली. यामध्ये व्हॉईस ऑफ मीडिया’च्या जिल्हा कार्याध्यक्षपदी सुनील पाटील, उपाध्यक्ष अर्जुन पाटील खरात, सरचिटणीस रमेश पाटील उंडाळ, कोषाध्यक्ष दीपक मापारी, कार्यवाहक संदीप डोंगरे, संघटक 

दत्ता महाले, राजेश दबडे, प्रवक्ता नारायण शिंदे, प्रसिद्धी प्रमुख फिरोज शहा तर जिल्हा कार्यकारणी सदस्यपदी राम परांडे, गणेश मोहळे, राम धनगर आदिची नियुक्ती करण्यात आली. सोबचत रिसोड 

तालुकाध्यक्षपदी विनोद बोडखे तर वाशीम शहराध्यक्षपदी दिलीप अवगन यांची नियुक्ती करण्यात आली़ याप्रसंगी पोस्टमन गणेश तिखे,अजय परसे, कैलास खंदारे आदिंसह जिल्ह्यातील पत्रकारबांधवांची उपस्थिती होती.


चौकट

सुरक्षा कवच विमा योजनाचा शुभारंभ 


बुलढाणा येथे ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या केंद्रीय बैठकीत ‘पत्रकारांची आरोग्य मोहीम’ या कार्यक्रमांतर्गत ‘कवच पॉलिसी’चे वाटप करण्यात येणार आहे़ येत्या सहा महिन्यांत राज्यातल्या प्रत्येक पत्रकाराला ही 'कवच पॉलिसी' मिळावी, अशी आखणी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या वतीने करण्यात आली आहे. त्यानुसार वाशीम येथे पार पडलेल्या बैठकीत ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे,राज्याध्यक्ष राजा माने, राज्य उपाध्यक्ष अनिल मस्के, राज्य संघटक सुधीर चेके पाटील, विदर्भ विभागीय अध्यक्ष मंगेश खाटिक यांच्या मार्गदर्शनात आज प्रात्यनिधीक स्वरुपात पत्रकारांचा विमा उतरवून वाशीम जिल्हाध्यक्ष भागवत मापारी यांनी या विधायक कामाचा शुभारंभ केला.

Related Posts

0 Response to "व्हॉईस ऑफ मीडिया’ची जिल्हा कार्यकारणी जाहिर"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article