जागतिक वसुंधरा दिनानिमित्त चित्रकला व निबंध स्पर्धा संपन्न
साप्तहिक सागर आदित्य/
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
जागतिक वसुंधरा दिनानिमित्त चित्रकला व निबंध स्पर्धा संपन्न
वाशिम - जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व जिल्हा सामान्य रुग्णालय यांचे संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना ३.० अंतर्गत प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांकरिता २२ एप्रिल रोजी जागतिक वसुंधरा दिनानिमित्त चित्रकला व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये २५ उमेदवारांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी
प्र.जिल्हा शल्य चिकित्सक धर्मपाल खेळकर, मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालयाचे प्रा. डॉ. दिलीप लांजेवार, कौशल्य विकास विभागाच्या सहायक आयुक्त श्रीमती सुनंदा बजाज, जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश मडावी,
डॉ. मोरे , डॉ. राठोड, उपस्थित होते.
यावेळी प्रा.दिलीप लांजेवार यांनी जागतिक वसुंधरा दिनानिमित्ताची सविस्तर संकल्पना प्रशिक्षणार्थीना
समजावून सांगितली.
श्रीमती सुनंदा बजाज यांनी माझी वसुंधरा अभियानांतर्गत नोंदणी करून ऑनलाईन शपथ घेऊन आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याची प्रभावी अंमलबजावणी करणेबाबत मार्गदर्शन केले.
खेळकर म्हणाले, वसुंधरा संवर्धन करणे ही आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. आपापल्या परीने योगदान देणे गरजेचे आहे.
यावेळी चित्रकला व निबंध स्पर्धेत प्रथम, द्वितीय तथा तृतीय आलेल्या उमेदवारांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता कौशल्य विकास विभाग तसेच जिल्हा शल्य चिकित्सक,
सामान्य रुग्णालय येथील कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
0 Response to "जागतिक वसुंधरा दिनानिमित्त चित्रकला व निबंध स्पर्धा संपन्न"
Post a Comment