महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी कर्तव्यदक्ष कु . प्रियंका गवळी यांचे हस्ते राष्ट्रध्वज वितरित करण्यात आले
साप्ताहिक सागर आदित्य
वाशिम : ७५ या आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत वाशिम येथील अंगणवाडी केंद्रासाठी आज दि. ९ ऑगस्ट रोजी महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी कर्तव्यदक्ष कु . प्रियंका गवळी यांचे हस्ते राष्ट्रध्वज वितरित करण्यात आले .. प्रसंगी अंगणवाडी सेविकांनी मानवी ७५ वा अमृत महोत्सवाचे बोध चिन्ह साकारून भारत माता की जय अशा घोषणा दिल्या हे करत असतांना अक्षरश : अंगावर शहारे उभे राहिले मॅडम , अशा शब्दात अंगणवाडी सेविकांनी मनोगत व्यक्त करत त्यांच्या डोळ्यात पाणी तरळले
१३ ते १५ ऑगस्ट दरम्यान हर घर झेंडा उपक्रमांतर्गत प्रत्येक कार्यालयावर व घरावर झेंडा उभारला जाणार आहे , त्याचप्रमाणे सदरील
कालावधीत विविध प्रकारच्या केली जाणार आहे ... त्याचप्रमाणे या . स्पर्धांचे आयोजन देखील अंगणवाडी स्तरावर ती केले जाणार आहे . यामध्ये समाज सुधारक व क्रांतिकारकारक यांच्यावरील भाषण स्पर्धा , रांगोळी स्पर्धा , काव्यवाचन व गायन स्पर्धा त्याचप्रमाणे काही केंद्रांवरती कायद्यां बाबत मार्गदर्शन देखील केले जाणार आहे . या सर्व बाबींमधून हर घर झेंडा हरघर पोषण बाबत जनजागृती केली जाणार आहे. आठवडयात देखील प्रभात फेरीच्या माध्यमातून गावोगावी जनजागृती करताना सेविका आपली भूमिका बजावत आहेत . महिला व बालविकास प्रकल्प कार्यालयाच्या या आगल्या वेगळ्या मानवी बोधचिन्हाचे जिल्हाभर कौतुक होत आहे..
0 Response to "महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी कर्तव्यदक्ष कु . प्रियंका गवळी यांचे हस्ते राष्ट्रध्वज वितरित करण्यात आले"
Post a Comment