-->

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार महामंडळ  योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार महामंडळ योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

 


साप्ताहिक सागर आदित्य 

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार महामंडळ

योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

       वाशिम, : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत कार्यरत असलेल्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत चर्मकार समाजासाठी विविध योजना राबविण्यात येतात. चर्मकार समाजाचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी राज्य शासनाव्दारे अनुदान व बीजभांडवल योजना तर केंद्र शासनामार्फत एनएसएफडीसी योजना राबविण्यात येते.


अनुदान व बीजभांडवल योजना


अर्टीशर्ती : विशेष घटक व बीज भांडवल योजनेतंर्गतचे यापुर्वीचे जुने कर्ज प्रस्ताव रद्द/बाद करण्यात येतील. कर्ज मागणी घटक व बीज स्वहस्ताक्षरात/टंकलिखीत अथवा महामंडळाच्या विहीत नमुन्यातील झेरॉक्स प्रतीत अर्ज स्विकारण्यात येतील. महामंडळ राबवित असलेल्या विविध योजनांची माहिती कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आलेली आहे. महामंडळ राबवित असलेल्या कुठल्याही शासकीय योजनेचा पती अथवा पत्नी यांनी लाभ घेतलेला असल्यास किंवा अर्जदार हा कुठलाही वित्तीय संस्थेचा थकबाकीदार असल्यास कर्ज प्रस्ताव अपात्र/ रद्द करण्यात येईल.


           अर्जदारांनी पुढे नमुद केलेली कागदपत्रासह जिल्हा कार्यालयात व्यक्तीशः अर्ज दाखल करणे आवश्यक आहे. कर्ज प्रस्ताव मध्यस्थामार्फत स्विकारले जाणार नाही. अर्जदारांकडून सर्व परीपुर्ण कागदपत्रे असलेलेच कर्ज प्रस्ताव स्विकारले जातील. अर्जदाराने अर्जासोबत जोडलेल्या सर्व कागदपत्रांवर अर्जदाराची स्वाक्षरी आवश्यक आहे. अर्जदाराने दाखल केलेली कागदपत्रे खोटी आढळून आल्यास त्यास जबाबदार धरून त्याच्यावर पुढील कार्यवाही करण्यात येईल. मध्यस्थ हे जर कामामध्ये हस्तक्षेप करीत असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करुन शासकीय कामात अडथळा आणल्याचा संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल. कर्ज प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर लाभार्थी निवड समितीच्या बैठकीमध्ये मान्यता घेऊन नंतरच कर्ज प्रस्ताव मंजुरीसाठी बँकेस/महामंडळाच्या प्रधान कार्यालयास पाठविण्यात येतील. प्राप्त कर्ज प्रस्ताव बँकेस पाठवितांना एका उद्दिष्टास दोन पट या पध्दतीने कर्ज प्रस्ताव ज्येष्ठतेनुसार बँकेकडे शिफारस करण्यात येईल.


दाखल करावयाचे कागदपत्रे : जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला (चालू वर्षाचा), रेशनकार्ड झेरॉक्स/रहिवासी दाखला, मतदान ओळखपत्र, आधारकार्ड, कोटेशन(GST सह), आवश्यकतेनुसार प्रकल्प अहवाल, वाहनाकरिता लायसन्स/परतावा/बॅच बिल्ला, जागेचा पुरावा लाईटबिल/टॅक्स पावती, व्यवसायाचे नाहरकत प्रमाणपत्र.


केंद्र शासनाची एन.एस.एफ.डी.सी. योजना


ज्या लाभार्थीनी यापुर्वी एन.एस.एफ.डी.सी. कर्ज योजनेअतंर्गत कर्ज प्रस्ताव दाखल केले आहे व ज्यांची लाभार्थी निवड समिती झालेली आहे व जे परिपूर्ण कर्ज प्रस्ताव जिल्हा कार्यालयामार्फत प्रधान कार्यालयास मंजुरीसाठी शिफारस करण्यात आलेली आहेत, अशा लाभार्थीची यादी महामंडळाच्या नोटीस बोर्डावर लावलेली असून संबंधित अर्जदारांनी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात संपर्क साधून कागदपत्रे दाखल करावी. 


कागदपत्रे याप्रमाणे : लाभार्थ्याचे उद्योग आधार प्रमाणपत्र, लाभार्थ्यांचे विनंती अर्ज, कागदपत्रे खरी असल्याबाबत व ज्या जागी व्यवसाय चालू आहे त्या जागेचा प्रमाणित केलेले छायाचित्र. चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखला, रहिवाशी दाखला. दोन सक्षम जामीनदारांपैकी नोकरदार असेल तर त्याच्या कार्यालयाचे लाभार्थ्यांने वसुलीचा भरणा केला नाहीतर जामीनदाराच्या पगारातून कपात करुन भरणा करण्यात येईल असे कार्यालयाचे हमीपत्र. जर लाभार्थ्याचा जामीनदार सरकारी नोकरदार असेल व तो सेवानिवृत्त झालेला असेल त्याच्या ऐवजी ज्या कर्मचाऱ्याची सेवा पाच ते सहा वर्ष बाकी आहे असा जामीनदार घेणे आवश्यक आहे. जिल्हा व्यवस्थापक यांचा स्थळ पाहणी अहवाल व शिफारस, लाभार्थ्याचा सिबील क्रेडिट स्कोअर, अर्जदाराचे वारसदाराच्या स्वाक्षरीसह नामांकन शपथपत्र. यापूर्वी कर्जाच्या अर्जाबरोबर सादर केलेल्या इतर कागदपत्रांची खातरजमा उदा. जातीचा दाखला, रेशनकार्ड, रहिवाशी दाखला, निवडणूक आयोग ओळखपत्र इ. लाभार्थ्याचा आधारकार्ड क्रमांक तसेच आधार संलग्न बँक खाते क्रमांक. जीएसटी क्रमांकासह व्यवसायाचे दरपत्रक. अर्जदाराचे विहित नमुन्यातील शपथपत्र इत्यादी कागदपत्रे दाखल करावीत. चर्मकार समाज बांधवांनी शासकीय योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. असे आवाहन संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.



Related Posts

0 Response to "संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार महामंडळ योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article