-->

सामाजिक न्याय पर्वानिमित्त  जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून विविध उपक्रम

सामाजिक न्याय पर्वानिमित्त जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून विविध उपक्रम

 

साप्ताहिक सागर आदित्य 

सामाजिक न्याय पर्वानिमित्त

जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून विविध उपक्रम

       वाशिम,  : 1 एप्रिल ते 30 एप्रिल 2023 दरम्यान सामाजिक न्याय पर्व साजरे करण्यात येणार आहे. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, वाशिम कार्यालयाच्या माध्यमातून विविध उपक्रम यादरम्यान राबविले जाणार आहे. यामध्ये जात वैधता प्रमाणपत्रासंबंधी कार्यवाही जलदगतीने होण्याकरीता त्रृटी पुर्तता कार्यशाळा, जलदगतीने सुनावण्यांचे आयोजन, दक्षता पथकामार्फत मार्गदर्शन, मुळ रेकॉर्ड कार्यशाळा, जात वैधता प्रमाणपत्र वाटप शिबीर, जिल्हा परिषद शाळेंच्या मुख्याध्यापकांचे ऑनलाईन मार्गदर्शन चर्चासत्र, जिल्हयातील महाविद्यालयातील समान संधी केंद्रातील प्रमुखास ऑनलाईन मार्गदर्शन, महाविद्यालयातील प्राचार्यांची ऑनलाईन सभा, बार्टीमार्फत राबविण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्रात मार्गदर्शन कार्यशाळा, जात वैधता प्रमाणपत्राबाबत पालकांची मार्गदर्शन कार्यशाळा व विधी विभागाकडून विशेष मार्गदर्शन शिबीर असे विविध कार्यक्रम जिल्हयात राबविण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमात विद्यार्थी, पालक, महाविद्यालयातील प्राचार्य व कर्मचारी वर्ग यांनी मोठया संख्येने सहभाग नोंदवावा. असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त तथा सदस्या डॉ. छाया कुलाल यांनी केले आहे.   



Related Posts

0 Response to "सामाजिक न्याय पर्वानिमित्त जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून विविध उपक्रम"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article