-->

राजमाता माँसाहेब जिजाऊ जयंती व विश्वगुरू स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त  जिल्हास्तरीय सामान्यज्ञानस्पर्धा  चे आयोजन

राजमाता माँसाहेब जिजाऊ जयंती व विश्वगुरू स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय सामान्यज्ञानस्पर्धा चे आयोजन


 

साप्ताहिक सागर आदित्य 

राजमाता माँसाहेब जिजाऊ जयंती व विश्वगुरू स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त

जिल्हास्तरीय सामान्यज्ञानस्पर्धा  चे आयोजन

(ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन चा शैक्षणिक उपक्रम)

स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन मार्फत  दि.२८ नोव्हेंबर २०२२ ते ५ जानेवारी २०२३ दरम्यान  जिल्हास्तरीय सामान्यज्ञानस्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा राष्ट्रमाता, राजमाता माँसाहेब जिजाऊ जयंती,विश्वगुरू स्वामी विवेकानंद जयंती तसेच स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन च्या ९ व्या वर्धापनदिनानिमित्त जिल्हास्तरीय सामान्यज्ञानस्पर्धा आयोजित करण्यात आली असल्याचे प्रतिपादन स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन चे अध्यक्ष राजेश पाटिल ताले यांनी सांगितले.ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना स्पर्धापरीक्षेची माहिती व्हावी,शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धापरीक्षेविषयी जागृती व्हावी,विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळावी,विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी,विद्यार्थ्यांना महापुरुषांचे विचार काळावेत, महापुरुषांच्या विचारांवर समाजाची निर्मिती व्हावी या उद्देशाने स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन माझोड,ता. जि. अकोला द्वारा जिल्हास्तरीय सामान्यज्ञानस्पर्धा गेल्या ९ वर्षांपासून आयोजित करण्यात येते.दरवर्षी अकोला-वाशिम जिल्ह्यातील जवळपास १० हजार विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होतात.दि.२८ नोव्हेंबर २०२२ ते ५ जानेवारी २०२३ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत विद्यार्थी बहुसंख्येने सहभागी होणार असल्याचे स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन च्या वतीने कळविण्यात आले आहे.या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्रतीक ताले(उपाध्यक्ष),योगेश महल्ले(सचिव),भूषण ताले,वैभव खंडारे,राहुल ताले,शिवहरी लाहुडकर,आदित्य टोळे, शिवम घोगरे,उद्धव भाकरे,विकास भाकरे,ज्ञानेश्वर सरप,ज्ञानेश्वर वानखडे,हरिष उगले,तुषार ताले,निवृत्ती गोंडचवर, अभिजित माहोरे,राम मालोकार,श्रीकृष्ण हनवते इ.कार्य करीत आहेत.

Related Posts

0 Response to "राजमाता माँसाहेब जिजाऊ जयंती व विश्वगुरू स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय सामान्यज्ञानस्पर्धा चे आयोजन"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article