
श्री पांडुरंग विद्यालयाचे खो-खो संघ जिल्हास्तरावर
साप्ताहिक सागर आदित्य
श्री पांडुरंग विद्यालयाचे खो-खो संघ जिल्हास्तरावर
पिंपळा:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मालेगाव तालुकास्तरीय शालेय खो- खो क्रीडा स्पर्धा दिनांक २१ व २२ नोव्हेंबर २०२२ या दोन दिवशी श्री. पांडुरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,पिंपळा येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये १७ वर्षे वयोगटात मुलांच्या खो-खो स्पर्धेत श्री.पांडुरंग विद्यालयाचा संघ विजयी ठरला व तो जिल्हास्तरावर पात्र ठरला. दुसऱ्या दिवशी मुलींच्या खो-खो क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये १४ वर्षे ,१७ वर्षे व १९ वर्षे वयोगटात पांडुरंग माध्यमिक विद्यालयाच्या मुलींनीच बाजी मारून तिन्ही गटात प्रथम क्रमांक पटकाविला व तीनही संघ हे जिल्हास्तरावर पात्र ठरलेले आहेत.या तीनही संघाचे संस्थेचे अध्यक्ष अनिल गवळी सर,मालेगाव तालुका क्रीडा संयोजक भिसडे सर तसेच विद्यालयातील प्राचार्य आर.एन. देशमुख सर व सर्व शिक्षक व कर्मचारीवृंदांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व जिल्हास्तरासाठी शुभेच्छा दिल्या.चारही संघानी आपल्या यशाचे श्रेय आई वडील, क्रीडा शिक्षक एन डी.भिंगे तर क्रीडा मार्गदर्शक जी.डी. कोरडे तसेच कोच उमेश इंगोले सर यांना दिले आहे.
0 Response to "श्री पांडुरंग विद्यालयाचे खो-खो संघ जिल्हास्तरावर"
Post a Comment