
श्री पांडुरंग माध्यमिक विद्यालयात भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी
साप्ताहिक सागर आदित्य
श्री पांडुरंग माध्यमिक विद्यालयात भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी
पिंपळा ता.मालेगाव येथील श्री.पांडुरंग माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात दिनांक १५ ऑक्टोबर २०२२ रोजी भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य आर.एन. देशमुख सर तर प्रमुख पाहुणे म्हणून जी.एम.कदम सर हे उपस्थित होते.
यावेळी वर्ग ५ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांनी ग्रंथालयातील विविध पुस्तकांचे वाचन केले व मिसाईल मॅन भारतरत्न डाॅ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना खरी आदरांजली वाहली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन. डी.भिंगे , प्रास्ताविक बी.ई.गवळी तर आभार प्रदर्शन जी.डी.कोरडे यांनी केले.
कार्यक्रमाला वर्ग ५ वी ते १२ वीचे बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
0 Response to "श्री पांडुरंग माध्यमिक विद्यालयात भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी "
Post a Comment