
दि.24 ते 26 नोव्हेंबर दरम्यान जिल्हा स्तरीय क्रिडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
साप्ताहिक सागर आदित्य
दि.24 ते 26 नोव्हेंबर दरम्यान
जिल्हा स्तरीय क्रिडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
वाशिम: 22
जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांच्या जिल्हा स्तरीय स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 24 ते 26 नोव्हेंबर दरम्यान जिल्हा क्रिडा संकुल येथे करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी दिली.
दि 24 नोव्हेंबर राजी सकाळी 10 वा. क्रिडा स्पर्धेचे उद्घाटन विभागीय आयुक्त दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते होणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान भूषवतील. प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस, आणि जिल्हा पोलिस अधिक्षक बच्चनसिंग यांची उपस्थिती लाभणार आहे. याच दिवशी सायंकाळी 6 वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी षण्मुगराजन यांच्या हस्ते होणार आहे. सीईओ वसुमना पंत ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणुन उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणुन पोलिस अधिक्षक बच्चनसिंग आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल निकम यांची उपस्थिती राहणार आहे.
तालुकास्तरावर निवड झालेल्या खेळाडुंच्या दिनांक 24 व 25 या दोन दिवस विविध स्पर्धा तसेच सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात येणार आहेत. जिल्हा स्तरावर निवड झालेल्या खेळाडुंची निवड विभागीय स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे.
जनतेची कामे करतांना ती अतिशय पारदर्शक व गतिमान पध्दतीने व्हावी अशी सामान्य लोकांची रास्त अपेक्षा असते. ही अपेक्षा पुर्ण करण्याच्या हेतुने व खेळाडु वृत्तीला चालना मिळावी तसेच सुप्त कला गुणांना वाव मिळावा यासाठी शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या जिल्हा स्तरीय क्रिडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी दिली.
0 Response to "दि.24 ते 26 नोव्हेंबर दरम्यान जिल्हा स्तरीय क्रिडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन"
Post a Comment