-->

कृषीपंप योजनेचा लाभ घेतलेले शेतकरी   पीएम - कुसुमसाठी ठरणार अपात्र

कृषीपंप योजनेचा लाभ घेतलेले शेतकरी पीएम - कुसुमसाठी ठरणार अपात्र

 


साप्ताहिक सागर आदित्य 

कृषीपंप योजनेचा लाभ घेतलेले शेतकरी 

पीएम - कुसुमसाठी ठरणार अपात्र 

वाशिम  अटल सौर कृषीपंप योजना -1 व 2 आणि मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेमध्ये लाभ घेतलेले शेतकरी महाकृषी ऊर्जा अभियान पीएम -कुसुम घटक - ब योजनेसाठी पात्र ठरणार नाही.त्यामुळे त्यांनी महाकृषी ऊर्जा अभियान पीएम - कुसुम घटक -ब योजनेच्या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करू नये. अर्ज भरल्यास त्यांचा अर्ज रद्द समजण्यात येईल.

            महाकृषि ऊर्जा अभियान पीएम-कुसुम घटक - ब योजनेअंतर्गत एका लाभार्थी शेतकऱ्याने एकाच सौर कृषीपंपाकरिता अर्ज सादर करावा.एकापेक्षा जास्त अर्ज सादर केल्यास इतर अर्ज रद्द करण्यात येईल.वरील योजनेअंतर्गत सौर कृषी पंपाचा लाभ घेतलेले शेतकरी हे सौर कृषीपंप काढून ठेवतात व लाभ घेतला नसल्याचे भासवून दुसरा सौर कृषीपंप महाकृषी ऊर्जा अभियान पीएम -,कुसुम घटक -ब योजनेअंतर्गत आस्थपित करून घेतात.ही बाब निदर्शनास आल्यास त्यांच्याकडील सौर कृषीपंप काढून घेण्यात येईल. त्यांनी भरलेला लाभार्थी हिस्सा जप्त करण्यात येईल व अशा शेतकऱ्यांविरुद्ध एफआयआर करण्यात येईल.असे महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणच्या अधिकाऱ्याने कळविले आहे.

Related Posts

0 Response to "कृषीपंप योजनेचा लाभ घेतलेले शेतकरी पीएम - कुसुमसाठी ठरणार अपात्र "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article