
जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये कवी कुसुमाग्रज संस्थेचे उत्कृष्ट प्रदर्शन
साप्ताहिक सागर आदित्य
जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये कवी कुसुमाग्रज संस्थेचे उत्कृष्ट प्रदर्शन
आपल्याला सर्वांना कळविण्यात येत आहे .की वीर सावरकर औद्योगिक प्रशिक्षण संस्था सातपूर येथे दिनांक 23 1 2024 व 24 1 2024 रोजी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा कवी कुसुमाग्रज औद्योगिक प्रशिक्षण संस्था निफाड यांनी सर्व खेळात उत्कृष्ट प्रदर्शन केले. आयोजित केलेल्या स्पर्धेत 100 मीटर धावणे, 400 मीटर धावणे, उंच उडी, लांब उडी ,बॅडमिंटन, कॅरम व बुद्धिबळ हे वैयक्तिक खेळ तसेच क्रिकेट, खो-खो ,हॉलीबॉल हे सांघिक खेळ यांचे आयोजन केले होते.
1.आपल्या संस्थेकडून कॅरम या प्रकारात जागृती रसाळ ही अंतिम विजेता ठरली.
2.बुद्धिबळ या प्रकारात जागृती रसाळ जिल्हास्तरीय उपविजेता ठरली.
3.लांब उडी या प्रकारात आपल्या संस्थेतील शंभू कहानी हा प्रशिक्षणार्थी तिसरा आला.
4.100 मीटर धावणे या प्रकारात मुलींमध्ये शितल पीठे या मुलीचा जिल्हास्तरीय तिसरा क्रमांक आला.
5.कॅरम या प्रकारात आपल्या संस्थेच्या दोन मुली जोडी या प्रकारात उपविजेत्या झाल्या.
6.उंच उडी या प्रकारात सविता आल्हाट या मुलीचा तिसरा क्रमांक आला.
सर्वच क्रीडा प्रकारात कवी कुसुमाग्रज संस्थेतील प्रशिक्षणार्थ्यांनी आपले उत्कृष्ट प्रदर्शन केले. बक्षीस वितरण माननीय आमदार सीमा हिरे सहसंचालक मुंडासे साहेब जिल्हा प्रशिक्षण अधिकारी काकड साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. माननीय आमदार सीमा हिरे व मुंडासे साहेब यांच्या हस्ते सर्व खेळाडूंना बक्षीस वितरण करण्यात आले. आमदार सीमा हिरे ,मूंडासे साहेब व काकड साहेबांनी सर्व कर्मचाऱ्यांचे व खेळाडूंची विशेष अभिनंदन केले सर्व क्रीडा प्रकारांमध्ये सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी
आपल्या परीने उत्कृष्ट प्रदर्शन केले .खो खो क्रिकेट हॉलीबॉल या खेळात देखील उत्कृष्ट प्रदर्शन केले.
संस्थेकडून तेलोरे सर ,सोनवणे सर, शिंदे सर, खळे सर, वायकुळे सर, गवळी सर, संगमनेर मॅडम, पूजा मॅडम ,दरोगे सर या कर्मचाऱ्यांनी सर्व खेळाडूंचा चांगल्या प्रकारे सराव करून घेतला . सर्व खेळाडूंना उत्कृष्ट मार्गदर्शन केले. जी मेहनत घेतली त्या कष्टाचे फळ आज आपल्याला मिळाले. मुंडासे साहेब व काकड साहेबांनी देखील आपल्या संस्थेतील सर्व खेळाडूंचे कर्मचाऱ्यांचे व प्राचार्य शिंदे मॅडम यांचे विशेष अभिनंदन केले.
0 Response to "जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये कवी कुसुमाग्रज संस्थेचे उत्कृष्ट प्रदर्शन "
Post a Comment