-->

श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालय वाशिम येथे  जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धा संपन्न...

श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालय वाशिम येथे जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धा संपन्न...

 


साप्ताहिक सागर आदित्य 

श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालय वाशिम येथे  जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धा संपन्न...

      श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालय वाशिम येथे  20 जानेवारी 2025 रोजी मोठ्या दिमागदार व थाटात जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धा संपन्न झाली. ही स्पर्धा केवळ फक्त कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी होती त्यामध्ये जिल्ह्यातील एकूण सहा तालुक्यांपैकी कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी, विद्यार्थिनी   बहुसंख्य प्रमाणामध्ये या वकृत्व स्पर्धेमध्ये  भाग घेतला होता. स्पर्धेचे विषय होते युवकांसमोरील आव्हाने, समाज माध्यमे आणि आजचा युवक, अंधश्रद्धा निर्मूलनात युवकाची भूमिका.या जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेत भारत कन्या कनिष्ठ महाविद्यालय रिसोड च्या विद्यार्थिनीनी यशाची परंपरा कायम ठेवत व उत्तुंग यशाची भरारी घेत प्रथम क्रमांक पुनम गणेश भांदुर्गे (स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि २१०१रुपये) , द्वितीय क्रमांक आरती दीपक साळवे (स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि १५०१ रूपये) , आणि तृतीय क्रमांक किरण कैलास पवार (स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि ११०१रुपये) व उत्तेजनार्थ पारितोषिक हरतालिका विजय पवार जिल्हा प्र, ( मा.शा ) विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वाशिम,. दुसरी उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त  विद्यार्थिनी अंजली रामकिसन काळबांडे - स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय कोकलगाव या दोन्ही विद्यार्थिनींना उत्तेजनार्थ पारितोषिक विभागून  देण्यात आले. अशाप्रकारे  जिल्हास्तरीय वकृत्व  स्पर्धेत घववीत  यश प्राप्त करणाऱ्या स्पर्धकाच्या पाठीवर आयोजकांनी शाब्बासकीची थाप दिली . या जिल्हास्तरीय वकृत्व  स्पर्धेचे आयोजन जिल्ह्यातील सर्वात जुने व पहिले समाजकार्य  महाविद्यालय संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती अंतर्गत श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालयाच्या  रौप्य  महोत्सवी वर्षा निमित्त जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आयोजक अध्यक्ष श्री सरस्वती प्रगत विद्या प्रसारक मंडळ वाशिमचे आदरणीय मनोज एस. कोठारी साहेब, महाविद्यालयाचे  आदरणीय  प्राचार्य डॉ. संदीप.एन. शिंदे, प्रा. उद्धव जमधाडे, स्पर्धा समन्वयक प्रा. डॉ.देवानंद एस. अंभोरे, समन्वयक (आय. क्यू.ए. सी.) प्रा. उद्धव बनकर, लेखापाल. बी.एच. पट्टेबहादूर, प्रा.डॉ. ए.पी. राऊत, प्रा. डी. एस. गोरे, प्रा. ए.डी. वाघ या मान्यवरांनी वकृत्व स्पर्धेचे उत्कृष्टपणे  आयोजन केले. स्पर्धेचे  परीक्षक म्हणून डॉ.एस.टी. राठोड, डॉ.आर. एस.मडावी, ग्रंथपाल व्ही.डी. इंगळे यांनी  निपक्षपातीपणे परीक्षण केले. स्पर्धेदरम्यान सर्व स्पर्धकांना उत्तम चहा व फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. विद्यार्थिनींच्या या उत्तुंग यशाबद्दल सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी भरभरून कौतुक व अभिनंदन केले.या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे बहारदार  सूत्रसंचालन प्रा. ज्ञानेश्वर गोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. शितल उजाडे यांनी केले व कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

Related Posts

0 Response to "श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालय वाशिम येथे जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धा संपन्न..."

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article