-->

श्री.पांडुरंग विद्यालयात सत्कार समारंभ संपन्न   पिंपळा

श्री.पांडुरंग विद्यालयात सत्कार समारंभ संपन्न पिंपळा

 


साप्ताहिक सागर आदित्य 

 श्री.पांडुरंग विद्यालयात सत्कार समारंभ संपन्न

 पिंपळा:- येथील श्री. पांडुरंग व  माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात  आमखेडा केंद्राच्या कर्तव्यदक्ष केंद्रप्रमुख सौ.इंदिरा राणे मॅडमची विस्तार अधिकारी (शिक्षण) पदी पदोन्नती तसेच आमखेडा केंद्रातील प्रभारी मुख्याध्यापक  उद्धवराव जोगदंड, सौ. सुनिता त-हाळे मॅडम  यांची उच्च श्रेणी मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती झाल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.

       कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य आर.एन. देशमुख सर तर प्रमुख पाहुणे म्हणून  ठाकरे सर तर सत्कारमुर्ती सौ.इंदिरा राणे मॅडम,सौ. सुनीता त-हाळे मॅडम व उध्वराव जोगदंड सर हे होते.      

     सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर विद्यालयातील स्काऊट मास्टर  एन. डी. भिंगे सर यांनी स्काऊट पथकांकडून सत्कारमूर्ती यांना स्काऊटचा स्कार्फ व बॅच लावून यथोचित सन्मान केला. यानंतर आमखेडा केंद्राच्या कर्तव्यदक्ष केंद्रप्रमुख सौ.इंदिरा राणे मॅडम यांचा विस्तार अधिकारी पदी पदोन्नती झाल्याबद्दल शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन वर्ग दहावीची विद्यार्थिनी कु. दुर्गा चव्हाण हिने सत्कार केला. जोडगव्हाण जिल्हा परिषद शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ. सुनीता तऱ्हाळे मॅडम यांची उच्च श्रेणी मुख्याध्यापिका पदी पदोन्नती झाल्याबद्दल शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन कु. योगिता गुडदे     हिने सत्कार केला.आमखेडा केंद्रीय शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक  उद्धवराव जोगदंड सर यांची उच्च श्रेणी मुख्याध्यापक पदी पदोन्नती झाल्याबद्दल शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक कदम सर यांनी यथोचित सन्मानपूर्वक सत्कार केला. 

       कार्यक्रमांमध्ये सर्व सत्कारमुर्ती यांनी आपले मनोगत व्यक्त केले व विद्यालयाचे मनःपूर्वक आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  बी.ई. गवळी सर प्रास्ताविक  व्ही.ई. मोरे सर तर आभार प्रदर्शन जी.डी. कोरडे सर यांनी केले. 

    कार्यक्रमाला वर्ग दहावीचे सर्व विद्यार्थी,विद्यार्थीनी तसेच शाळेतील शिक्षक व कर्मचारी वृंद बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Posts

0 Response to "श्री.पांडुरंग विद्यालयात सत्कार समारंभ संपन्न पिंपळा"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article