भा.मा. कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात अनंत पारितोषिका अंतर्गत गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार व शिक्षक दिन साजरा
साप्ताहिक सागर आदित्य
भा.मा. कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात अनंत पारितोषिका अंतर्गत गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार व शिक्षक दिन साजरा.... भारत माध्यमिक कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड येथे दिनांक 5 सप्टेंबर रोजी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस शिक्षक दिन मोठ्या हर्षेउल्हासात साजरा करण्यात आला. तसेच वर्षभरामध्ये ज्या विद्यार्थिनींनी विशेष प्राविण्य प्राप्त केलेले आहे अशा गुणवंत विद्यार्थिनींचा अनंत पारितोषिकांतर्गत सत्कार मान्यवरांच्या हस्ते साजरा करताना.या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. जयश्रीताई देशमुख, बद्रीनाथ कोकाटे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती रिसोड, सौ.विद्याताई सारडा.नायब तहसीलदार रिसोड, सौ. अमिताताई गिऱ्हे बालविकास प्रकल्प अधिकारी रिसोड, भारत माध्यमिक कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ.मंजुषा सु. देशमुख मॅडम माता पालक शिक्षक संघाच्या अध्यक्ष व सचिव जेकोटिया मॅडम व सोळुंके मॅडम ,भारत मराठी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका दुबे मॅडम, तसेच रिसोड नगर परिषदेच्या माजी अध्यक्षा प्रा.विजयमाला आसनकर मॅडम , व भारत माध्यमिक विद्यालय चिंचांबाभर चे मुख्याध्यापक .शिंदे सर इत्यादी मान्यवरांच्या हस्ते शिक्षक दिन व सत्कार समारंभ पार पडला. प्रथमतः दरवर्षी सेवा जेष्ठतेनुसार अशा दोन आदर्श शिक्षकाचा गुणगौरव केला जातो. या वर्षातले आदर्श शिक्षक विजय हराळकर सर व आदर्श शिक्षिका सौ.स्मिता देशमुख मॅडम या शिक्षक- शिक्षिकेचा आदरणीय सौ. जयश्रीताई देशमुख यांच्या हस्ते शाल, श्रीफळ ,ट्रॉफी आणि बुके देऊन गौरव करण्यात आला. तदनंतर महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ.मंजुषा सु.देशमुख मॅडम यांनी आपल्या प्रास्ताविकातून अनंत पारितोषिक व गुणगौरव सोहळ्याचा उद्देश स्पष्ट करत असताना गुणवंताच्या पाठीवर शाब्बासकीची थाप मारली तर नक्कीच त्यांना एक प्रेरणा मिळते व या प्रेरणेतून गाव , देश आणि राष्ट्र घडते अशा गुणवंताचा सत्कार करत असताना ज्या दात्यांनी अनामत रक्कम ठेवी ठेवलेल्या आहेत त्यातून गुणवंतांना ट्रॉफी, मेडल व सन्मानपत्र त्यांना भेट दिली जातात. कन्या शाळेतील 75 टक्के विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातील असून शहरातल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेमध्ये ह्या मुली कशा प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर व अग्रगण्य आहेत. याचा नामउल्लेख आपल्या प्रस्तावितेतून केला. तदनंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते त्यामध्ये शहरी व ग्रामीण भागातून अष्टपैलू विद्यार्थिनी,तसेच प्रत्येक इयत्तेतुन प्रथम येणाऱ्या, विषयातून प्रथम येणाऱ्या, तसेच क्रीडा, गीत गायन, सुंदर हस्तक्षर अशा विविध उपक्रमांमध्ये प्राविण्य प्राप्त विद्यार्थिनींचा गुणगौरव करण्यात आला. त्यानंतर विद्याताई सारडा नायब तहसीलदार, रिसोड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शिक्षकाच्या अंगी आईची ममता व वडीलाची कर्तव्यदक्षता याचा सुंदर मिलाफ असतो असे सूचक विधान केले .तसेच आपल्या कवितेतून उपस्थित प्रेक्षकांचे लक्ष व मन वेधून घेतले. आदरणीय अमिताताई गिऱ्हे बालविकास प्रकल्प अधिकारी,रिसोड यांनी सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देत विद्यार्थिनींना अमूल्य असे मार्गदर्शन करत असताना महिलानी आज प्रत्येक क्षेत्र काबीज केलेले आहे .आपणाला रडणारी स्त्री नको लढणारी स्त्री हवी आहे .असे सूचक विधान केले. शेवटी अध्यक्षीय मनोगतातून दि आर्य शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा आदरणीय सौ. जयश्रीताई देशमुख यांनी परमेश्वरापेक्षाही गुरुचे स्थान आजही श्रेष्ठ कसे आहे हा संत कबीर यांचा संदर्भ देत 'गुरु गोविंद दोहो खडे.... यातून गुरु आणि परमेश्वर एका ठिकाणी उभे असताना शिष्य प्रथमतः गुरूच्या चरणावर नतमस्तक होतो हा प्राचीन संदर्भ अथवा दाखला देत गुरुचे स्थान व कार्य कसे पवित्र आहे. हे गुरु विषयी आपल्या मनोगतातून विचार मांडले. तसेच विद्यार्थिनींना भावी वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा देत स्वतः सक्षम बना असा सूचक सल्ला दिला. या कार्यक्रमाचे स्वागत गीत व रॉक गीत सफा पठाण व सिद्धी तायडे या विद्यार्थिनी गाऊन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने पालक वर्ग व विद्यार्थिनी उपस्थित असून यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन विजय भाऊ हराळकर सर व सहनिवेदीका प्रा. दीपिका पुंड आणि किरण राजगुरू मॅडम यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा.श्याम चौमवाल यांनी केले.
0 Response to "भा.मा. कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात अनंत पारितोषिका अंतर्गत गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार व शिक्षक दिन साजरा"
Post a Comment