
वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांना निवेदन देवून समस्या बाबत चर्चा करण्यात आली.
साप्ताहिक सागर आदित्य
वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांना निवेदन देवून समस्या बाबत चर्चा करण्यात आली.
आज महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी संघटना आयटकच्या वतीने जिल्हा जिल्हा परिषद समोर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी आपल्या विविध मागण्या मान्य करण्यासाठी आंदोलन केले सविता इंगळे जिल्हाध्यक्ष वाशिम यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आले. आंदोलनामध्ये प्रमुख मागण्या म्हणून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पूर्व प्राथमिक शिक्षकेचा दर्जा देऊन वेतनश्रेणी लागू करणे थकीत प्रवास भत्ता हा त्वरित देण्यात यावा अंगणवाडी केंद्रांना मिळणारे हे साहित्य हे थेट अंगणवाडी केंद्राला पुरवठा करावा मोबाईल रिचार्ज चा खर्च ताबडतोब द्यावा तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांना मिळणारा कच्चा आहार वाटप करावा शिजवून वाटप केल्याने पूर्व प्राथमिक शिक्षण देताना अंगणवाडी सेविका मिळत नाही त्यामुळे हा आहार त्वरित बचत गटांना देण्यात यावा मिनी अंगणवाडी सेव केला नियमित अंगणवाडी सेविकेप्रमाणे मानधन देण्यात यावे व मिनी अंगणवाडी केंद्राला मदतीची नियुक्ती करावी अंगणवाडीला लागणारे रजिस्टर हे शासनाने पुरवावे त्याचप्रमाणे मासिक अहवाल हे सुद्धा शासनाने पुरवावे. किरकोळ खर्च साठी पाच हजार रुपयाची तरतूद करावी या व इतर मागण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सीईओ मॅडम यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर माननीय चंद्रकांत ठाकरे जिल्हा परिषद अध्यक्ष निवेदन देण्यात आले. मोर्चाला कॉम्रेड डिंगाबर अंभोरे सविता इंगळे मालती राठोड सीता सीताबाई खिल्लारे गणेश ढोबळे सोनल ढोबळे ज्योतीताई देशमुख अंजूताई वानखेडे माधुरीताई पाठक कांताताई मोरे या व इतर अंगणवाडी सेविका मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या
0 Response to "वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांना निवेदन देवून समस्या बाबत चर्चा करण्यात आली."
Post a Comment