महाराष्ट्र ही साधूसंताची पुण्यभूमी आणि छत्रपती शिवरायांची प्रेरणा घेऊन लढणार्या क्रांतिकारकांची तपोभूमी - गोपाल भिसडे
साप्ताहिक सागर आदित्य/
महाराष्ट्र ही साधूसंताची पुण्यभूमी आणि छत्रपती शिवरायांची प्रेरणा घेऊन लढणार्या क्रांतिकारकांची तपोभूमी - गोपाल भिसडे
आपल्या भारत देशात राज्य अनेक आहेत पण "राष्ट्र" एकच आहे ते म्हणजे महाराष्ट्र!राष्ट्र एवढ्यासाठी की महाराष्ट्राने आपल्या कर्तृत्वाने,स्वाभिमानाने या देशात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमच्या महाराष्ट्राचा श्वास...शिवराय इथल्या प्रत्येक माणसाच्या रक्तात वाहतात.सह्याद्री म्हणजे महाराष्ट्राच्या पाठीचा कणा...जो कधी दिल्लीच्या तख्तापुढे झुकत नाही.हा इतिहास आहे, वर्तमान आहे आणि भविष्य पण आहे. कोरोणाचे संकट आपल्या लाडक्या राज्यावर चे नुकतेच संपले आहे अश्यातच काही राजद्रोही महाराष्ट्रावर राजकीय संकट आणू पाहात आहेत पण मला वाटते त्यांचा इतिहास थोडा कच्चा आहे कारण, अशी किती संकटे या महाराष्ट्रावर आली आणि इथल्याच मातीत मिसळून गेली संकटांचा सामना केल्याशिवाय महाराष्ट्रात कोणी मोठा होत नाही. इथे मोठा व्हायचं असेल तर तुमचं कर्तुत्व सिद्ध करावे लागते. महाराष्ट्राचे तेज या संकटाने कमी होण्याऐवजी अधिक उजळून निघेल यात काही शंका नाही कारण हा माझा महाराष्ट्र आहे चला तर मग आपण महाराष्ट्र दिन त्याच उत्साहात त्याच गर्वात... थोडीशी काळजी घेऊन साजरा करू.सर्वधर्मसमभाव हे सूत्र अंगीकारून सर्वांना एकत्र पुढे नेणारा आपला महाराष्ट्र आहे. अलीकडे जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न राज्यात सुरू आहे. या प्रयत्नांना बळी न पडता समाजात एकोपा कायम राखूया. पुरोगामी महाराष्ट्राचा वारसा जपण्याचा तसेच आपल्या मेहनतीतून प्रगतीचा आलेख सतत उंचावत नेणाऱ्या सर्व कामगारांचा सन्मान करण्याचा आज निर्धार करूया.
0 Response to "महाराष्ट्र ही साधूसंताची पुण्यभूमी आणि छत्रपती शिवरायांची प्रेरणा घेऊन लढणार्या क्रांतिकारकांची तपोभूमी - गोपाल भिसडे"
Post a Comment