
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला ‘कॅच द रेन’ मोहिमेचा आढावा
साप्ताहिक सागर आदित्य
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला
‘कॅच द रेन’ मोहिमेचा आढावा
वाशिम, : जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज 11 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात जलशक्ती अभियानाच्या कॅच द रेन मोहिमेचा आढावा आयोजित सभेत घेतला. यावेळी मृद व जलसंधारण विभागाचे जिल्हा जलसंधारण अधिकारी सुभाष आकोसकर, जिल्हा परिषदेचे जलसंधारण अधिकारी लक्ष्मण मापारी, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता व्ही. डी. पाटील, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, नगर पालिका प्रशासन अधिकारी दिपक मोरे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता एन. एम. राठोड, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे कनिष्ठ भूवैज्ञानिक सुरसे, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता .वानखेडे, सहायक वनसंरक्षक श्री राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.
षण्मुगराजन यावेळी म्हणाले, प्रत्येक पंचायत समितीने ग्रामपंचायत अंतर्गत जास्तीत जास्त वृक्षांची लागवड 15 ऑगस्टपूर्वी करावी. खाजगी इमारतीला बांधकामाची परवानगी देतांना रेन वॉटर हार्वेस्टिंगचे काम करणे बंधनकारक करावे. विहीर पुनर्भरणाची कामे तसेच नादुरुस्त असलेल्या बोअरवेल दुरुस्तीची कामे मोठया प्रमाणात करण्यात यावी. प्रत्येक ग्रामसेवकाला खाजगी इमारतीवर रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या कामांची उद्दिष्टे देऊन जास्तीत जास्त रेन वॉटर होर्वेस्टिंगची कामे करावी. ज्या गावामध्ये शासकीय कर्मचारी, अंगणवाडी सेविका यांची घरे आहेत त्यांच्या इमारतीवर रेन वॉटर हार्वेस्टिंगची कामे करण्यात यावी. असे त्यांनी सांगितले.
सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे देखील ग्रामीण भागात मोठया प्रमाणात हाती घ्यावी. असे सांगून षण्मुगराजन म्हणाले, जलसंधारणाची ही सर्व कामे सप्टेंबर 2022 पूर्वी पुर्ण करण्यात यावी. जी कामे झाली आहे ती सर्व कामे संकेतस्थळावर अपलोड करण्यात यावी. असे ते यावेळी म्हणाले.
कृषी विभाग, नगरविकास विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, मृद व जलसंधारण विभाग, वन विभाग आणि पंचायत समितीअंतर्गत करण्यात आलेल्या जलसंधारण कामांची आणि करण्यात येणाऱ्या कामांची माहिती यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. या सभेला सर्व नगर पालीका व नगरपंचायतचे मुख्याधिकारी, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आणि जलसंधारण विभागाचे उपविभागीय अभियंते उपस्थित होते.
0 Response to "जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला ‘कॅच द रेन’ मोहिमेचा आढावा"
Post a Comment