-->

ग्रामीण भागात ‘स्वच्छ माझे अंगण अभियान’ सुरु.  नागरिकांनी सहभागी व्हावे: सीईओ वैभव वाघमारे

ग्रामीण भागात ‘स्वच्छ माझे अंगण अभियान’ सुरु. नागरिकांनी सहभागी व्हावे: सीईओ वैभव वाघमारे



साप्ताहिक सागर आदित्य 

 ग्रामीण भागात ‘स्वच्छ माझे अंगण अभियान’ सुरु.

नागरिकांनी सहभागी व्हावे: सीईओ वैभव वाघमारे

ग्रामपंचायत स्तरावर कुटुंबांचा होणार सन्मान

वाशिम,दि. 3

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत स्वच्छ माझे अंगण अभियान दि. १ जानेवारी २०२५ ते २० जानेवारी २०२५ या कालावधीत संपूर्ण राज्यभर राबविण्यात येत असून जिल्ह्यातही हे अभियान प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी दिले.  

प्रत्येक कुटुंबाने स्वच्छतेचे उच्चतम मानक राखत ग्रामीण भाग स्वच्छ व सुंदर बनवणे, वैयक्तिक शौचालयाचा नियमित वापर आणि दैनंदिन स्वच्छतेचे पालन, घरगुती कचऱ्याचे वर्गीकरण व पुनर्वापर, कंपोस्ट खत तयार करणे, परसबाग व सांडपाणी व्यवस्थापनासाठी शोषखड्डा व पाझरखड्ड्यांचा वापर करणे हे या अभियानाचे उद्दिष्टे आहेत.

अभियानाचा कालावधी व टप्पेः

अभियान कालावधीः १ जानेवारी २०२० ते २० जानेवारी २०२५ पडताळणी कालावधी: २९ जानेवारी २०२५ ते २४ जानेवारी २०२५ पात्र कुटुंबांना निमंत्रणः २५ जानेवारी २०२५

प्रशस्तीपत्र व सन्मानः २६ जानेवारी २०२५

या अभियानात स्वच्छतेचे आदर्श उदाहरण ठरलेल्या कुटुंबांचा २६ जानेवारी रोजी ग्रामसभेत प्रशस्तीपत्र, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येईल. ग्रामीण भागात स्वच्छतेचा आदर्श निर्माण करून इतरांना प्रेरित करण्यासाठी प्रत्येक कुटुंबाने या अभियानात सहभागी व्हावे. घरातील कचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन व शौचालयांच्या स्वच्छतेबाबत नियमांचे पालन करावे. यासाठी गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी (पंचायत), ग्राम विकास अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी महिला बचत गट व ग्रामस्थांनी या अभियनात सक्रिय सहभागी व्हावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी  वैभव वाघमारे , जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण गणेश कोवे,  पंचायत विभागाचे  उपमुख्य कार्यकारी अधिकारी आत्माराम बोंद्रे व जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुळकर्णी  यांनी केले आहे. 

------------------------------------------

              -राम श्रृंगारे, जनसंपर्क अधिकारी, जिल्हा परिषद वाशिम

0 Response to "ग्रामीण भागात ‘स्वच्छ माझे अंगण अभियान’ सुरु. नागरिकांनी सहभागी व्हावे: सीईओ वैभव वाघमारे"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article