-->

जिल्ह्यात सुरू झाली 'आमचे शौचालय आमचा सन्मान' स्पर्धा

जिल्ह्यात सुरू झाली 'आमचे शौचालय आमचा सन्मान' स्पर्धा

 


साप्ताहिक सागर आदित्य 

जिल्ह्यात सुरू झाली 'आमचे शौचालय आमचा सन्मान' स्पर्धा


शौचालये स्वच्छ ठेवणाऱ्या कुटूंबप्रमुखासह सरपंच, ग्रामपंचायत अधिकाऱ्याचा जिल्हास्तरावर होणार सन्मान


जागतिक शौचालय दिनानिमित्ताने दि. 14 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत ‘आमचे शौचालय -आमचा सन्मान’ या स्पर्धेनिमित्ताने ग्रामपंचायत अंतर्गत वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयाची दुरुस्ती, स्वच्छता, वापर व रंगरंगोटी करणाऱ्या कुटुंबप्रमुख तसेच सार्वजनिक शौचालयासाठी सरपंच व ग्राम पंचायत अधिकाऱ्यांचा जिल्हास्तरावर सन्मान करण्याच्या राज्य शासनाच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. 10 डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या या मोहिमेत ग्रामस्थांनी सहभाग घेण्याचे आवाहन सीईओ वैभव वाघमारे यांनी केले. 


जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयाची वापर दुरुस्ती व सुशोभीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून जागतिक शौचालय दिनानिमित्ताने विशेष मोहीम दि. 14 नोव्हेंबर ते दहा डिसेंबर या दरम्यान आयोजित करण्यात आलेली आहे. नादुरुस्त असे शौचालय वापरात आणले शिवाय पाण्यासाठी नळ जोडणी तसेच वीज जोडणीची व्यवस्था करणे त्याचप्रमाणे दरवाजा कडी कोंडा शिवाय फरशी छत दुरुस्ती इत्यादी बाबींवर भर देऊन आपले शौचालय उत्कृष्ट करावे, याकरिता ही जनजागृती मोहीम आयोजित केलेली आहे. दिनांक 5 डिसेंबर पर्यंत प्रत्येक गावात अशा प्रकारे शौचालयाच्या निर्मितीसाठी विशेष गृह संपर्कच भेटीचे आयोजन करण्यात येणार आहे. यादरम्यान नादुरुस्त शौचालय शोधून त्याची दुरुस्ती करण्याचे आवाहन देखील ग्रामपंचायत स्तरावर ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समिती करणार आहे. जागतिक शौचालय दिनानिमित्ताने गावातील या मोहिमेदरम्यान उत्कृष्ट निर्माण केलेल्या दोन कुटुंबांना ग्रामपंचायत स्तरावर सन्मानित करण्यात येणार आहे, तसेच या दोन कुटुंबांची नावे पंचायत समिती मार्फत जिल्हास्तरावर सन्मानासाठी नाम निर्देशन करण्यासाठी पाठवणार आहेत. प्राप्त झालेल्या सर्व उत्कृष्ट शौचालयापैकी पाच कुटुंबांची निवड जिल्हास्तरावरती होणार असून त्यांचा सन्मान जिल्हास्तरावर करण्यात येणार आहे. जिल्ह्यात उपलब्ध करून दिलेले सर्व सार्वजनिक शौचालयाची देखील याच पद्धतीने दुरुस्ती व इतर सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने जनजागृती मोहीम घेण्यात येणार आहे. प्रत्येक पंचायत समिती स्तरावर याची पाहणी करून तीन उत्कृष्ट शौचालयांची माहिती जिल्हास्तरावर प्राप्त होणार आहे. प्राप्त झालेल्या सर्व प्रस्तावांची व शौचालयाची पाहणी केल्यानंतर त्यातील तीन सर्वोत्कृष्ट सार्वजनिक शौचालयांचा निर्मिती करिता परिश्रम घेतलेल्या सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांचा सन्मान जिल्हास्तरावर करण्यात येणार आहे. 

आमचे शौचालय-आमचा सन्मान या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी सहभाग घ्यावा, तसेच प्रत्येक गावातील कुटुंबाने शौचालय सुविधा उत्कृष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी केले आहे. 

वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांचा वापर होण्याकरिता ग्रामस्थांमध्ये गृहभेटीच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारे समन्वय साधता येणार आहे त्यामुळे गावातील ग्रामपाणी पुरवठा व स्वच्छता समितीच्या मदतीने स्वच्छता फेरी काढून सर्व शौचालय या मोहिमेदरम्यान वापरात राहतील याकरिता पुढाकार घ्यावा, असे आवाहन पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुलकर्णी यांनी केले आहे.

*****

-राम श्रृंगारे, जन संपर्क अधिकारी, जिल्हा परिषद वाशिम

0 Response to "जिल्ह्यात सुरू झाली 'आमचे शौचालय आमचा सन्मान' स्पर्धा"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article