जिल्हाधिकाऱ्यांकडून रिसोड विधानसभा मतदारसंघ निवडणूक पूर्वतयारीचा आढावा
साप्ताहिक सागर आदित्य
जिल्हाधिकाऱ्यांकडून रिसोड विधानसभा मतदारसंघ निवडणूक पूर्वतयारीचा आढावा
अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी घेतली वाशिममध्ये बैठक
वाशिम : अकोला लोकसभा मतदारसंघांतर्गत रिसोड विधानसभा मतदारसंघ निवडणूक पूर्वतयारीचा आढावा अकोला जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार यांनी आज वाशिम येथे घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील राजे वाकाटक सभागृहात अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या आढावा सभेत आगामी अकोला लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने 33 रिसोड मतदार संघातील मालेगाव व रिसोड तालुक्यातील सर्व माहितीचा व निवडणूकविषयक सर्व बाबींचा आढावा घेण्यात आला. यावेळी अकोलाचे उप जिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर, वाशिमच्या उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, तहसीलदार रिसोड प्रतीक्षा तेजनकर, मालेगावचे तहसीलदार दीपक पुंडे, नायब तहसीलदार सुनील देशमुख, रिसोड नायब तहसिलदार विद्या जगाडे, निवासी उपजिल्हाधिकारी यांचे स्विय सहाय्यक सुनील कराले, महसूल सहाय्यक गजानन देशमुख, महसूल सहाय्यक संदीप काळबांडे, रिसोड मालेगाव येथील ऑपरेटर विष्णू टोंचर, राजेश शर्मा, नायब तहसीलदार सतीश काळे, अव्वल कारकून अतुल देशमुख, रवी महाले उपस्थित होते.
या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी मतदान केंद्राचा ठिकाण, आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने अतिसंवेदनशिल मतदान केंद्राची माहिती, क्षेत्रिय अधिकारी नियुक्त करणे, फिरते पथक पथक, स्थिर सर्वेक्षण पथक पथके ठिकाण निश्चिती करणे, मतदार याद्यांमध्ये 100+ वयोमर्यादा दर्शविणाऱ्या वगळणी पात्र मतदार, वेब कास्टींग यंत्रणा कार्यान्वित करण्याचे अनुषंगाने मतदान केंद्राची यादी सादर करणे, महिला अधिकारी व कर्मचारी यांचेव्दारे संचलीत करण्यात येणारे मतदान केंद्र, युवा अधिकारी व कर्मचारी यांचेव्दारे संचलीत करण्यात येणारे मतदान केंद्र, दिव्यांग अधिकारी व कर्मचारी यांचेव्दारे संचलीत करण्यात येणारे मतदान केंद्र, परदानशीन मतदान केंद्र, साहित्य आवक जावक केंद्र, मतदानापूर्वी व नंतर मतदान यंत्र ठेवण्यासाठीचे सुरक्षा कक्ष, मतदान पथकांचे प्रशिक्षण व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे स्तरावरील विविध प्रशिक्षण, वाहतूक व्यवस्थापन आराखडा व नकाशा, मतदान केंद्रांवरील पायाभूत सूविधांची सद्यस्थिती, मतदार संख्या,ईव्हीएम व व्हिव्हिपॅटची उपलब्धता, मतदान पथके, निवडणूक साहित्य उपलब्धता, २०१९ मध्ये संपन्न झालेल्या लोकसभा व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दरम्यान दाखल निवडणूक विषयक गुन्हे, तसेच जप्त केलेल्या रोख रक्कम, मद्य, अंमली पदार्थ, मौल्यावान धातू, फ्रिबीज यांचा तपशिल तसेच त्यानुषंगाने दाखल केलेल्या गुन्हे तपशिल व त्यांची सद्यस्थिती आदी विषयांचा विस्तृत आढावा घेतला.
यावेळी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने सुक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
००००
Maharashtra DGIPR Election Commission of India
Chief Electoral Officer Maharashtra
0 Response to "जिल्हाधिकाऱ्यांकडून रिसोड विधानसभा मतदारसंघ निवडणूक पूर्वतयारीचा आढावा"
Post a Comment