-->

मापारी यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार

मापारी यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार

 


साप्ताहिक सागर आदित्य 

मापारी यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार

जल संधारण विभागाचे कार्यकारी अभियंता मापारी हे नुकतेच सेवा निवृत्त झाले . त्यांनी जवळपास ३0 वर्षे सेवा दिली असून त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्यात जल संधारणची अनेक महत्वपूर्ण कामे झाल्यामुळे शेती व शेतकऱ्यांना मोठा हातभार मिळाला आहे . सेवा निवृत्ती प्रसंगी त्यांचा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भावपुर्ण सत्कार केला . त्यांनी सेवेची सुरवात  सहाय्यक अभियंता श्रेणी २ पदावरून केली व त्याच पदावर जिल्हा परिषदेमध्ये रुजू झाले  होते आज ते प्रादेशिक जलसंधारण अधिकारी या पदावरून सेवा निवृत्त झाले.  मापारी हे मन मिळावू आणि अभ्यासू वृत्तीचे अधिकारी असल्यामुळे त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्यात गाळ मुक्त धरण आणि गाळ युक्त शिवार, जलयुक्त शिविर, पाझर तलावाचे साठवण तलावात रूपांतर, बंधा-याची कामे इत्यादी शेतकरी हिताचे उपक्रम यशस्वी राबविण्यात आले . यामुळे शेतीला सिंचनाची सोय तर झालीच शिवाय शेतीचा दर्जा सुधारला . हजारो एकर शेती सिंचनाखाली आल्याने शेतकऱ्यांचे  जीवनमान उंचावले . तसेच जिल्ह्यात जि अनेक बंधारे बांधन्यात आली , त्यामुळे वाहून जाणारे पावसाचे पाणी अडविण्यात आले . यामुळे कोरडवाहू शेती सिंचनाखाली आली . यासह शासनाचे अनेक प्रकल्प यशस्वी राबविण्यात आले . मात्र त्यांचा कार्यकाळ २९ फेब्रुवारी २०२४ रोजी संपला . यावेळी कर्मचारी , अधिकारी यांनी मापारी यांचा भावपुर्ण निरोप संभारंभ आयोजित करून सपत्नीक सत्कार केला . यावेळी त्यांना निरोप देण्यासाठी केवळ अधिकारी , कर्मचारी यांनीच नव्हे तर विविध क्षेत्रातील मान्यवर , नागरिकांनी गर्दी केली होती . यावेळी विचार व्यक्त करताना मापारी म्हणाले की , मी माझ्या शासकीय सेवेत जनतेच्या हिताला प्राधान्य देत शासकीय योजना राबविण्यासाठी प्रामाणिक पणे प्रयत्न केले . वाशीम जिल्ह्यात जल संधारण च्या कामातून मागासलेल्या जिल्ह्यात भरीव कार्य करण्याची संधी मिळाली . यामध्ये अधिकारी , कर्मचारी यांची मोलाची साथ मिळाली . वाशीम च्या जनतेचे प्रेम कायम स्मरणात राहतील असेही ते म्हणाले .

जिल्हा परिषदेचे  अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, सिओ वैभव वाघमारे सभापती  आमचे सदस्य  पांडुरंग ठाकरे जिल्हा परिषदेचे सर्व विभागांचे खाते प्रमुख  कोवे  ,सपकाळे  , लोखंडे , आपुस्कर  जलसंधारण विभागातून नुकतेच सेवानिवृत्त झाले परंतु एक मापारी  प्रति असलेल्या प्रेम याकरिता साहु , शिंदे , राजुरकर , वानखेडे , कोरे , दाबेराव , गिरी  कार्यक्रमास आवर्जून येथे उपस्थित राहिले . जिल्हा परिषदेचे  सभापती जिल्हा परिषद सर्व संधारण विभागाचे अधिकारी कर्मचारी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे तसेच संपूर्ण जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी कर्मचारी यांचे देखील प्रसंगी शुभेच्छा दिल्या त्याबद्दल आपले सर्वांचे आभार  मापारी यांनी मानले.यानंतर लगेचच भोजनाचा स्ने भोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता सर्वांना   भोजनाचा आनंद घेतला आणि त्यानंतरच या कार्यक्रमाची सांगता झाली

Related Posts

0 Response to "मापारी यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article