-->

जिल्ह्यातील रिसोड, वाशिम आणि कारंजा मतदारसंघात होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी बुवनेश्वरी एस यांनी जिल्हास्तरीय नोडल अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आदींची बैठक घेऊन निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला.

साप्ताहिक सागर आदित्य 

जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात झालेल्या या आढावा सभेस उप जिल्हा निवडणूक अधिकारी राम लंके, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, रिसोडच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली देवकर, वाशिमचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र जाधव, कारंजाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे तसेच सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते. 

वाशिम जिल्ह्यातील आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक विषयक कामकाज सुरळितपणे पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांच्या आदेशाने नोडल अधिकारी व कर्मचारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

यात मुख्य नियंत्रण कक्ष, वाहतूक व्यवस्थापन, आदर्श आचार संहिता, बॅलेट पेपर आणि पोस्टल बॅलेट पेपर व्यवस्थापन, कायदा व सुव्यवस्था, प्रसार माध्यम आणि संदेशवहन, निवडणूक निरीक्षक, प्रशिक्षण आणि जनजागृती, मतदान केंद्र, मतदान केंद्रावरील किमान मूलभूत सुविधा, दिव्यांग मतदार, स्वीप मोहीम शहरी व ग्रामीण भाग या निवडणूक विषयक कामकाजासाठी नोडल अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जिल्हाधिकारी बुवनेश्वरी यांनी केल्या आहेत. या नोडल अधिकाऱ्यांना सोपविण्यात आलेल्या कामकाजाचा आढावा त्यांनी आज घेतला व सूचना दिल्या.

भारत निवडणूक आयोगाने नियमपुस्तिका आणि मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार जिल्हास्तरीय नोडल अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, तहसीलदार आणि निवडणुकीशी संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी कार्यवाही करावी. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सूक्ष्म नियोजन करून आपापल्यास्तरावर तयारी पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी बुवनेश्वरी एस यांनी संबंधितांना दिले.

नोडल अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नियुक्त करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय नोडल अधिकाऱ्यांचे आज प्रशिक्षण घेण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे आणि उप जिल्हा निवडणूक अधिकारी राम लंके यांनी नोडल अधिकाऱ्यांना नेमून दिलेल्या कामाची सादरीकरणाद्वारे माहिती देवून त्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी निवडणूक शाखेतील नायब तहसिलदार सतीश काळे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

००००

Maharashtra DGIPR Election Commission of India Chief Electoral Officer Maharashtra

0 Response to "जिल्ह्यातील रिसोड, वाशिम आणि कारंजा मतदारसंघात होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी बुवनेश्वरी एस यांनी जिल्हास्तरीय नोडल अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आदींची बैठक घेऊन निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला."

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article