-->

सेवा पंधरवडानिमित्त मॉ गंगा परिचारीका विद्यालयात  ज्येष्ठ नागरीकांची मोफत आरोग्य तपासणी

सेवा पंधरवडानिमित्त मॉ गंगा परिचारीका विद्यालयात ज्येष्ठ नागरीकांची मोफत आरोग्य तपासणी

 


साप्ताहिक सागर आदित्य 

सेवा पंधरवडानिमित्त मॉ गंगा परिचारीका विद्यालयात

ज्येष्ठ नागरीकांची मोफत आरोग्य तपासणी

         वाशिम,  :   मॉ गंगा परिचारीका विद्यालय, वाशिम व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, वाशिम यांच्या संयुक्तवतीने आज 19 सप्टेंबर रोजी सेवा पंधरवडानिमित्त मॉ गंगा परिचारीका विद्यालय येथे ज्येष्ठ नागरीकांचे मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबीराचे उदघाटन ज्येष्ठ नागरीक श्रीमती कलावतीबाई दिघे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी बाहेती रुग्णालयाचे संस्था चालक डॉ. हरिष बाहेती, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारोती वाठ, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, मॉ गंगा परिचारीका विद्यालयाच्या प्राचार्य श्रीमती अघमकर, समाज कल्याणचे निरीक्षक आर.ए. शिरभाते, श्रीमती एस.पी. देखणे व श्रीमती आर.एन. साठे यांची प्रमुख उपस्थिती होती.

          या शिबीरात उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरीकांची मधुमेह, उच्च रक्तदाब, हाडातील कॅल्शियम तसेच इतर आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबीरात 20 ज्येष्ठ नागरीकांची तपासणी करुन डॉक्टरांनी योग्य तो सल्ला दिला. यावेळी डॉ. बाहेती यांनी ज्येष्ठ नागरीकांना उदभवणाऱ्या विविध आजारांबाबत तसेच त्यांच्यावरील उपचाराबाबत मार्गदर्शन करुन आरोग्य शिबीरामध्ये तपासणी करण्याचे आवाहन केले. शिबीराच्या आयोजनामागील उद्देश समाज कल्याण निरीक्षक  शिरभाते यांनी विषद केला. शिबीराच्या यशस्वीतेसाठी मॉ गंगा परिचारीका विद्यालयाच्या विद्यार्थीनी आणि समाज कल्याणच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.   



Related Posts

0 Response to "सेवा पंधरवडानिमित्त मॉ गंगा परिचारीका विद्यालयात ज्येष्ठ नागरीकांची मोफत आरोग्य तपासणी"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article