-->

जलाशय व तलावाखाली गाळपेर जमिन  चारा पिकासाठी शेतकऱ्यांना मिळणार भाडे पट्टयावर

जलाशय व तलावाखाली गाळपेर जमिन चारा पिकासाठी शेतकऱ्यांना मिळणार भाडे पट्टयावर

 


साप्ताहिक सागर आदित्य 

जलाशय व तलावाखाली गाळपेर जमिन

चारा पिकासाठी शेतकऱ्यांना मिळणार भाडे पट्टयावर


 राज्यातील दुष्काळी परिस्थीतीचा विचार करता गाळपेर जमिनीवर चारा पिकांचे उत्पादन करुन जनावरांसाठी चारा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने जलसंपदा विभाग व मृद व जलसंधारण विभागाकडील जलाशय व तलावाखालील गाळपेर जमिन शेतकऱ्यांना चारा पिके घेण्याकरीता सन 2023-24 मधील रब्बी व उन्हाळी हंगामासाठी नाममात्र 1 रुपये दराने भाडे पट्टयावर देण्यात येणार आहे. 


गाळपेर जमिनीमध्ये मका व ज्वारी या वैरण पिकांची लागवड करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने 100 टक्के अनुदानावर बियाणे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.गाळपेर जमिनीवर घेण्यात येणाऱ्या वैरण पिकासाठी जलाशयातील पाणी विनामुल्य उपसाकरीता परवानगी देण्यात येणार आहे.यासाठी पाणी पट्टी आकारली जाणार नाही.कृषी व पदुम विभागाच्या 15 नोव्हेंबर 2018 व 21 सप्टेंबर 2023 रोजीच्या शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.तरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक पशुपालक व शेतकऱ्यांनी विहीत नमुन्यातील अर्ज पशुधन विकास अधिकारी (वि.) पंचायत समिती येथे करावा.असे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. संजय गोरे यांनी कळविले आहे. 


0 Response to "जलाशय व तलावाखाली गाळपेर जमिन चारा पिकासाठी शेतकऱ्यांना मिळणार भाडे पट्टयावर"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article