
आरोग्य वर्धीनी केंद्र काटा येथे
साप्ताहिक सागर आदित्य
वाशिम अंतर्गत मधील आरोग्य वर्धीनी केंद्र काटा येथे डॉ. कोरे सर (जिल्हा आरोग्य अधिकारी) डॉ.कावरखे (जिल्हा शल्य चिकीत्सक) डॉ. परभणकर (जिल्हा क्षयरोग अधिकारी) डॉ रुईकर सर (वैद्यकिय अधिकारी) यांचे मार्गदर्शनाखाली संशयित क्षयरुग्नाची x-ray तपासणी करण्यात आली. वैभव रोडे (क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी ) यांनी 53 संशयितांचे एक्स रे काढण्याचे काम केले. डॉ.मनीषा चव्हाण मॅडम (तालुका आरोग्य अधिकारी) डॉ.कुंडलिक फुफाटे सर (वैद्यकिय अधिकारी) डॉ.विजय काळे (वैद्यकिय अधिकारी)यांचे मार्गदर्शनाखाली पुंडलिक देवढे (आरोग्य सेवक) श्रीमती आशा प्रधान, श्रीमती आशा ढोके (आरोग्य सहाय्यीका) श्रीमती हर्षा खडसे (गटप्रर्वतक ) रामेश्वर सोनुने(वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक) मगेश पिंपरकर (उपचार पर्यवेक्षक) गणेश राऊत (वाहनचालक एक्स रे वाहन) रामकिसन मोरे (सामजिक कार्यकर्ता) तसेच आशा कार्यकर्ती उपस्थित होत्या सर्वांनी सहकार्य केले. यावेळी 27 संशयित रुग्णाचे स्पुटम गोळा करण्यात आले.तसेच मॉर्निग सँपल देण्याबाबत सांगण्यात आले.सर्व उपस्थितांना क्षयरोग, डेंग्यू, आभा कार्ड, गोल्डन कार्ड बाबत आरोग्य शिक्षण देण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन रामदास गवई (आरोग्य निरीक्षक, जिल्हा क्षयरोग केंद्र ) यांनी केले.
0 Response to "आरोग्य वर्धीनी केंद्र काटा येथे"
Post a Comment