-->

जल जीवन  मिशनच्या जनजागृती रथाला हिरवी झेंडी

जल जीवन मिशनच्या जनजागृती रथाला हिरवी झेंडी

 


साप्ताहिक सागर आदित्य/

जल जीवन  मिशनच्या जनजागृती रथाला हिरवी झेंडी

वाशिम दिनांक 4 जानेवारी -

जिल्हा परिषदच्या पाणी व स्वच्छता विभागांतर्गत जल जीवन  मिशनच्या आयईसी रथाचे उदघाटन 4 जानेवारी रोजी हिरवी झेंडी दाखवुन जि. प. अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी केले.  मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, उपाध्यक्ष डॉ. श्याम गाभणे, समाज कल्याण सभापती वनिता देवरे, ‍ महिला व बाल कल्याण सभापती शोभा गावंडे यांची ‍यावेळी विशेष उपस्थिती होती. ‍


जिल्हयातील  ग्रामीण कुटुंबांना नळ जोडणी देणे, लोकांमध्ये शुध्द पाणी, पाणी बचत, जल पुनर्भरण, पाण्याचा काटकसरीने वापर याबाबत  या रथाच्या माध्यमातुन गावोगावी जनजागृती करण्यात येणार आहे. याबाबत जनजागृती करण्याकरीताजिल्हा स्तरावर ‍ होर्डिंग लावण्यात आले आहेत. हा उपक्रम जि. प. अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे व मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असल्याची माहिती जल जीवन मिशनचे संचालक गजानन वेले यांनी दिली.जिल्हा परिषदेच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग ठाकरे,‍ अरविंद इंगोले पाटील, सुधीर कवर,‍ आशीष दहातोंडे, आर. के. राठोड, उमेश ठाकरे, वैभव सरनाईक, ‍अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल निकम, मुख्य लेखा व वित्त अधिकारी तुषार मोरे, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे, पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन वेले, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. विनोद वानखडे, उप मुख्य कार्यकारी अधकिारी संजय जोल्हे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, शिक्षण अधिकारी रमेश तांगडे, ग्रामिण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अतुल साळुंखे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मण मापारी, कृषिकारी बंडगर, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मोहन श्रृंगारे,विलास ‍ खील्लारे,  संतोष वंबवाडे, प्रमोद बदरखे,  सुधाकर पंडे, सुरेश कांबळे यांची उपस्थिती होती. जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे सहायक प्रशासन अधिकारी रवि सोनोने, प्रदिप सावळकर, प्रफुल्ल काळे, शंकर आंबेकर, सुमेर चाणेकर, पुष्पलता अफुणे, विजय नागे,  प्रविण पान्हेरकर,‍ अभीजीत दुधाटे,‍ अमित घुले, राम श्रृंगारे यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. 






0 Response to "जल जीवन मिशनच्या जनजागृती रथाला हिरवी झेंडी"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article