-->

कृषि महाविद्यालय आमखेडा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले  जयंती साजरी

कृषि महाविद्यालय आमखेडा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी


साप्ताहिक सागर आदित्य/

कृषि महाविद्यालय आमखेडा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले  जयंती साजरी


 आमखेडा: गीताई ह्युमनकाईंड डेव्हलपमेंट ट्रस्ट, पुणे द्वारा संचालित, डॉ. दे. कृ. वि. अकोला संलग्नित कर्मयोगी बाबारावजी जोगदंड कृषि महाविद्यालय, (अहिंसातीर्थ)आमखेडा ता. मालेगाव जि. वाशीम येथे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. 

या कार्यक्रमाला डॉ. एस एम जाधव प्रा. कु. पुर्वी गुप्ता यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात  करण्यात आली. 

महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. ईश्वरी बुरघाटे, कु साक्षी वैराळकर, कु. आकाक्षा पानझाडे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. पी. टी. निचळ, डॉ. जी. एच. वसु, रा.से.यो. कार्यक्रम समन्वयक प्रा.एस. टी. कव्हर    प्रा. एस बी वाकूडकर  प्रा . डी. टी. बोरकर, प्रा एस टी जाधव व महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी  व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. अंजली गव्हाणे, कु. वेदीका चौधरी व आभार प्रदर्शन कु शुभांगी भोयर यांनी केले.






0 Response to "कृषि महाविद्यालय आमखेडा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article