-->

गावकऱ्यांचा उपक्रम : लोकवर्गणीतून गावातील पांदण रस्ता

गावकऱ्यांचा उपक्रम : लोकवर्गणीतून गावातील पांदण रस्ता




साप्ताहिक सागर आदित्य/

गावकऱ्यांचा उपक्रम : लोकवर्गणीतून गावातील पांदण रस्ता

 मालेगाव : तालुक्यातील आमखेडा व  दुबळवेल या दोन्ही गावाचे खूप जुने ऋणानुबंध परंतु  गावं  आले की, सर्व प्रथम रस्ता हा सर्वात महत्त्वाचा विषय ठरतो.  आपण शेतकरी, सर्वप्रथम आपण शेतीला प्राधान्य देतो परंतु त्या शेतीसाठी पण रस्ता हा महत्त्वाचा विषय ठरतो. पण आज घडते ते खूप आनंदाची गोष्ट आहे पिढ्या न पिढया रेंगाळत पडलेला हा रस्त्याचा विषय म्हणजे दोन्ही गावासाठी महत्वाचा, त्या रस्त्यासाठी आज या दोन्ही गावाच्या नागरिकांनी घेतलेला वसा आपल्याला खूप सुंदर करायचा आहे पण त्यासाठी लागतोय तो सर्वात महत्वाचा वेळ आणी पैसा पण आपल्याला जर भावी पिढीसाठी काही आदर्श ठेवायचा असेल तर काही गोष्टी चा त्याग पण करावाच लागतो. जसे आपल्याला थोर पुरुष लाभले. जरी आपल्याला गाडगेबाबा होता आले नाही तरी त्यांचा विचारांचा  वसा तो पुढे  नेऊ शकतो या आपल्या दोन्ही गावाच्या सर्व नागरिकांनी खारीचा वाटा उचलायला आहे. मग तरुण मंडळी  असो वा वडील मंडळी तसेच महिला मंडळ या सर्वानी "माझ गाव माझी जबाबदारी" या विचारानेच आपण आपले उद्दिष्ट पुर्ण करु त्या साठी होईल तेवढे  श्रमदान, बरीचशी मंडळी आपल्या उदरनिर्वाहासाठी बाहेरगावी आहे त्यांनी पण होईल  त्या परीने मदत करायलाच पाहीजे. आपलीपण गावासी नाळ जोडलेली असायला पाहिजे, खरच ज्या रस्त्याची  आपण सर्व जण वाट पाहत होतो ते स्वप्न आज याची देही याची डोळा पाहतो.





0 Response to "गावकऱ्यांचा उपक्रम : लोकवर्गणीतून गावातील पांदण रस्ता"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article