-->

वाशिम सायक्लोथॉन २०२२ उपक्रम उत्साहात

वाशिम सायक्लोथॉन २०२२ उपक्रम उत्साहात


 साप्ताहिक सागर आदित्य/

वाशिम सायक्लोथॉन २०२२ उपक्रम उत्साहात

वाशिम - भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त वाशिम तहसिल माहेश्वरी संघटना, वाशिम सायकलस्वार ग्रुप, न्यु शर्मा सायकल आणि क्रॉस बाईकच्या संयुक्त पुढाकारातून २ जानेवारी रोजी भव्य वाशिम सायक्लोथॉन २०२२ हा सामाजीक उपक्रम राबविण्यात आला.

  या सायक्लोथॉन स्पर्धेत लहान मुलांसाठी २० किमी तर मोठ्यांसाठी ३० किमीची सायकल फेरी ठेवण्यात आली होती. सायकल फेरीचा प्रारंभ शहरातील महेश भवन प्रांगणातून सुरू होऊन रिसोड रस्त्यावर १० किलोमीटर आणि १५ किलोमीटर अशी सायकल चालवत महेश भवन प्रांगणात सायक्लोथॉनचा समारोप झाला. या उपक्रमात सायकलस्वारांनी ऑफलाइन आणि ऑनलाइन पद्धतीने प्रवेश घेवून उपक्रमात भाग घेतला. उपक्रमामध्ये सायकलस्वारांना आयोजकांकडून टी-शर्ट, पदके आणि प्रमाणपत्रे देण्यात आली. सायक्लोथॉन दरम्यान शासकीय जिल्हा रुग्णालयाकडून रुग्णवाहिका व डॉक्टरांची व्यवस्था ठेवण्यात आली होती. वाशिम सायक्लोथॉन २०२२ चा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी वाशिम तहसील माहेश्वरी संघटना, वाशिम सायकल रायडर ग्रुप आणि न्यू शर्मा ब्रदर्सचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.





0 Response to "वाशिम सायक्लोथॉन २०२२ उपक्रम उत्साहात"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article